बॉलिवूड सेलिब्रिटीज आणि होळी हे कनेक्शन आपल्यासाठी जुनं नाही. चित्रपटातील गाणी असो किंवा खऱ्या खुऱ्या आयुष्यातील धमाकेदार पार्ट्या बॉलिवूड सेलिब्रिटीज अगदी थाटात होळी साजरी करतात. कित्येक सेलिब्रिटीजचे फोटोजही प्रचंड व्हायरल होतात. बरेच बॉलिवूड कलाकार होळीच्या निमित्ताने जंगी पार्टी ठेवतात.
या निमित्ताने सगळे एकत्र येऊन रंग खेळतात. याबरोबरच सेलिब्रिटीज त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छासुद्धा देतात. ‘फर्जी’स्टार शाहिद कपूरनेसुद्धा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक भन्नाट व्हिडिओ शेअर करत हटके स्टाईलमध्ये शाहिदने शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : ‘ब्रह्मास्त्र’मधील अभिनेता ‘कपिल शर्मा शो’वर संतापला; ट्वीट करत म्हणाला, “कपिल तू लोकांना हसवतोस…”
शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटातील होळीदरम्यानचा एक सीन आहे ज्यामध्ये कबीर चेहऱ्यावर होळीच्या निमित्ताने रंग लावून त्याच्या बाइकवरुन अत्यंत रागाने जाताना आपल्याला दिसतो. तोच सीन या व्हिडिओच्या माध्यमातून शाहिदने शेअर केला आहे. शाहिदचा हा चित्रपटातील रागीट चेहेरा पाहून बरेच जण गोंधळले असतील, पण व्हिडिओच्या शेवटी शाहिदने लिहिलं की, “काही नाही भावांनो..फक्त होळीच्या शुभेच्छाच द्यायला येत होतो.”
या व्हीडिओखाली शाहिदच्या चाहत्यांनी भन्नाट कॉमेंट केल्या आहेत. एक युझरने कॉमेंटमध्ये लिहिलं की, “सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नानंतर कबीर त्यांना शुभेच्छा द्यायला जात आहे.” चाहत्यांना शाहिदचा हा व्हिडिओ चांगलाच पसंत पडला आहे. शाहिद कपूरने नुकतंच ‘फर्जी’ या वेबसीरिजमधून ओटीटी विश्वात पदार्पण केलं. यामधील शाहिदच्या कामाची खूप प्रशंसा झाली.