Fatima Sana Shaikh : दंगल गर्ल अशी ओळख असलेल्या फातिमा सना शेख या अभिनेत्रीने खरंत आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चाची ४२० हा बाल कलाकार म्हणून तिचा पहिला सिनेमा. त्यानंतर तिने दंगल या सिनेमात गीता फोगटची भूमिका निभावली. दंगल सिनेमानंतर कास्टिंग काऊचचा अनुभव कसा आला होता? हे फातिमाने आता एका मुलाखतीत सांगितलं आहे. फातिमा सना शेखने दंगलमध्ये केलेल्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. त्यानंतर मात्र ती मोठ्या भूमिकेत दिसलेली नाही. आमिर खानच्या ठग्ज ऑफ हिंदुस्थान या चित्रपटातही फातिमा सना शेख होती. मात्र हीदेखील फार मोठी भूमिका नव्हती. अशात आता फातिमाने तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हटलं आहे फातिमाने?

फातिमाने दंगल सिनेमानंतर ल्युडो, अजीब दास्ताँ, धक धक अशा चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र दंगल नंतर तिला भूमिका मिळवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. त्यावेळी मी भूमिका शोधत होते. मला एका कास्टिंग दिग्दर्शकाने सांगितलं की तुझं प्रोफाइल पाठव. तो कास्टिंग डायरेक्टर दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतला होता. त्याने मला विचारलं तुला ही भूमिका दिली तर त्यासाठी तू सगळं काही करु शकतेस ना? त्यावर मी त्याला म्हटलं हो मी या भूमिकेसाठी जी आवश्यक आहे ती मेहनत घेईन. नंतर मला तो सातत्याने सांगू लागला की तुला सगळं करावं लागेल, तू तयार आहेस ना? तेव्हा मला हे बघायचं होतं की तो आणखी किती खालच्या थराला जाऊन बोलू शकतो. शेवटी त्याला ते नीट सांगता आलंच नाही. त्याची त्यालाच लाज वाटली. असा अनुभव फातिमाने सांगितला. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत फातिमाने हा अनुभव सांगितला. तसंच हैदराबाद या ठिकाणीही असाच एक अनुभव आल्याचं फातिमाने सांगितलं.

हैदराबादमध्येही मला असाच अनुभव आला-फातिमा

मी एका चित्रपटाच्या निमित्ताने हैदराबादला गेले होते. त्यावेळी काही निर्मात्यांना भेटले. ते निर्माते फारच वाईट आणि विचित्र पद्धतीने बोलत होते. अगदी थेट नाही पण आडून आडून एकच विचारणा ते करत होते. मला वाटतं सध्या सगळीकडेच हा प्रकार आला आहे. मला खरोखरच या गोष्टीसाठी वाईट वाटतं की लोक अशा प्रकारे महिलांकडे पाहतात. फातिमा सॅम बहादुर या सिनेमात इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसली होती. तसंच तिचा धक धक हा सिनेमाही आला. आता फातिमा मोठ्या भूमिकेच्या प्रतीक्षेत आहे. अशात तिला आलेले दोन अनुभव तिने सांगितले आहेत.