‘फिफा विश्वचषक २०२२’चं विजेतेपद पटकावल्यानंतर अर्जेंटिना संघाचा मुख्य खेळाडू लिओनेल मेस्सीचा आनंद गगनात मावेनासा झाला. अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देणारा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची सध्या जगभरात चर्चा आहे. दरम्यान लिओनेल मेस्सीची पत्नीही अँटोनेला रोकुझोलाही आनंदाने भारावून गेली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – ‘पठाण’ चित्रपटाच्या वादादरम्यान शाहरुख खानची प्रकृती बिघडली, म्हणाला, “फक्त डाळ-भात खातो कारण…”

मेस्सीच्या पत्नीने पती व मुलांबरोबर खास फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला. तिने फोटो शेअर करत म्हटलं की, “वर्ल्ड चॅम्पियन. मला सुद्धा कळत नाही की सुरुवात कशी करावी. आम्हाला तुमचा किती अभिमान आहे. आम्हाला कधीही हार न मानायला शिकवलं. धन्यवाद. आम्हाला शेवटपर्यंत लढायचे आहे. शेवटी हे झाले की तुम्ही जगज्जेता ठरला, आम्हाला माहित आहे की तुम्ही इतकी वर्ष काय सहन केलं. चला अर्जेंटिनाला जाऊया.”

मेस्सीच्या पत्नीच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. मेस्सी व त्याच्या कुटुंबियांचं अनेकांनी सोशल मीडियाद्वारे कौतुक केलं. तर सेलिब्रिटी मंडळींनीही मेस्सीच्या पत्नीच्या या पोस्टवर कमेंट व लाइक केलं. शिवाय शाहरुख खानची लेक सुहाना खाननेही अँटोनेला रोकुझोलाची पोस्ट लाइक केली.

आणखी वाचा – स्वयंपाकघरात काम, घरातील कपडे धुण्याचीही शाहरुख खानवर आली वेळ, कारण…

शाहरुख ‘पठाण’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘फिफा विश्वचषक २०२२’च्या अंतिम सामन्याला पोहोचला होता. तर दुसरीकडे सुहानाही ‘फिफा विश्वचषक २०२२’चा अंतिम सामना पाहण्यास उत्सुक होती. मेस्सीच्या पत्नीची पोस्टही सुहानाला खूप आवडली. तर इतर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही तिची ही पोस्ट लाइक केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa wc 2022 messi wife share emotional post on social media shahrukh khan daughter suhana khan like photos see details kmd