फिफा वर्ल्ड कप २०२२ ची ट्रॉफी अर्जेंटिनाने आपल्या नावे करत नवा विक्रम रचला. सध्या या विश्वचषकाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचबरोबरीने फिफा वर्ल्ड कप २०२२च्या अंतिम सामन्याला दीपिका पदुकोणने हजेरी लावत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. दीपिकाने फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचं अनावारण केलं. विशेष म्हणजे फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचं अनावारण करणारी ती पहिली ग्लोबल स्टार ठरली. यावेळी दीपिकाने हटके ड्रेस परिधान केला होता.
आणखी वाचा – ‘बेशरम रंग’ गाण्यासाठी दीपिका पदुकोणने परिधान केली एवढी महाग बिकिनी, किंमत आहे तब्बल…
दीपिकाने फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचं अनावारण करणं भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट होती. पण दीपिकाची एक चूक तिला सध्या महागात पडत आहे. दीपिकाने या खास क्षणी जो ड्रेस परिधान केला तो नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला नाही.
दीपिकाला तिच्या ड्रेसवरुनच सध्या बरंच ट्रोल करण्यात येत आहे. दीपिकाने यावेळी काळ्या रंगाची पँट, पांढऱ्या रंगाचं शर्ट व ब्राउन रंगाचं लेदर जॅकेट परिधान केलं होतं. शिवाय तिने लावलेला बेल्टही विशेष लक्ष वेधून घेत आहे. पण तिच्या या लूकची तुलना नेटकऱ्यांनी रणवीर सिंगच्या अल्लाउद्दीन खिलजी या भूमिकेशी केली आहे.
दीपिका पदुकोणने अंगभर कपडे परिधान केले आहेत. कारण हे कतार आहे. दीपिकाने रेनकोट का परिधान केला आहे, रणवीर सिंगलाच दीपिका कॉपी करते अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
तसेच तुला चांगल्या स्टायलिस्टची गरज असल्याचा सल्लाही दीपिकाला अनेकांनी दिला आहे. भगवी बिकिनी वादानंतर दीपिका पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.