फिफा वर्ल्ड कप २०२२च्या विश्वचषकावर अर्जेंटिनाने नाव कोरलं. रविवारी(१८ डिसेंबर) रोजी अर्जेंटिना व फ्रान्समध्ये विश्वचषकाचा रंगतदार सामना खेळला गेला. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने दमदार कामगिरी करत विश्वचषक आपल्या नावावर केला. २०१४ साली अपूर्ण राहिलेलं स्वप्न मेस्सीने या वर्ल्ड कपमध्ये पूर्ण केलं. मेस्सीने त्याचा शेवटचा वर्ल्ड कप चाहत्यांसाठी अविस्मरणीय बनवला आहे.

अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सर्वच स्तरातून मेस्सीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मेस्सीवर लवकरच बायोपिक येणार असल्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार बायोपिकमध्ये मेस्सीची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे. ट्विटरवर अक्षय कुमारचे अर्जेंटिनाच्या जर्सीतील फोटो व्हायरल होत आहेत. परंतु, हे फोटो अक्षयच्या ‘हाऊसफुल ३’ या चित्रपटातील आहेत.

हेही वाचा >> फिफा वर्ल्ड कपवर अर्जेंटिनाने नाव कोरल्यानंतर गौरव मोरेने शेअर केला लिओनेल मेस्सीचा फोटो, म्हणाला…

मेस्सीच्या चाहत्यांनी अक्षय कुमारचे अनेक मीम्सही शेअर केले आहेत. एकाने अक्षय कुमारचा फुटबॉल खेळतानाचा फोटो शेअर करत “ब्रेकिंग न्यूज : मेस्सीच्या बायोपिकमध्ये अक्षय कुमार दिसणार मुख्य भूमिकेत” असं म्हटलं आहे.

तर दुसऱ्याने ट्वीटमध्ये “अक्षय कुमार मेस्सीवर बायोपिक बनवणार, तयारी सुरू” असं म्हटलं आहे.

एका नेटकऱ्याने मेस्सीच्या बायोपिकचं नावही घोषित केलं आहे. ‘लिओनेल मेस्सी: द लेजंड ऑफ अर्जेंटिना’ असं नाव चाहत्याने मेस्सीच्या बायोपिकला दिलं आहे.

हेही वाचा>> लिओनेल मेस्सीसाठी पत्नीने अर्धवटच सोडलं होतं डेन्टिस्ट व्हायचं स्वप्न; जाणून घ्या मॉडेल असलेल्या एंटोनेला रोकुजोबद्दल

अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मीम्सचा धुमाकूळ घातला आहे. आता अक्षय कुमारच्या अर्जेंटिनाच्या जर्सीमधील फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे.

Story img Loader