चंदेरी दुनियेचं गारुड कोणाला नसतं. मुंबई ही तर स्वप्ननगरी. ‘मै माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ’ म्हणत अनेकजणी येतात. शाहरुखप्रमाणे ‘झिरो टू हिरो’ व्हायला अनेकजण मुंबानगरीत अवतरतात. पण अनेकजण या चमचमत्या दुनियेमागच्या गडद काळोखात हरवून जातात. काहींच्या करिअरचं विमान टेकऑफच घेत नाही. काहींचं घेतं पण प्रवास मनाजोगता होत नाही. लेफ्ट प्रोफाईल, राईट प्रोफाईल, पोर्टफोलिओ, फोटोशूट, ऑडिशन्स या चक्रात अनेक जीव उमेदीची वर्ष देतात. पण बॉलीवूडचा नायक होण्याऐवजी ते स्वत:च्या आयुष्याचे खलनायक होतात. चित्रपटाचा खेळ म्हणजे एक आभास असतो. अनेकांच्या बाबतीत तो आभासच राहतो. रिअल ते रील हे संक्रमण भल्याभल्यांना झेपत नाही.

चंदेरी दुनियेचे हे पदर झोया अख्तरने ‘लक बाय चान्स’ या पदार्पणाच्या चित्रपटातून उलगडले आहेत. तिकीटबारीवर हा चित्रपट फार चालला नाही पण चित्रपटांचं विश्व कसं असतं याचा आरसा झोयाने दाखवला. किती प्रतिभाशाली आहात, किती मेहनत करताय याइतकंच तुमचं नशीब किमयागार ठरु शकतं याची जाणीव करुन देणारी ही कलाकृती. प्रत्येक क्षेत्रात प्रस्थापितांचं एक वर्तुळ असतात. त्या वर्तुळात जाण्यासाठी तुम्ही योग्य लोकांच्या संपर्कात यावं लागतं. यू शूड बी अॅट राईट टाईम अॅट राईट प्लेस अशी इंग्रजीत म्हण आहे. त्याचा प्रत्यय येतो. नेटवर्किंग आणि व्हिजिबिलटी या संकल्पना आता खूपच चघळचोथा झाल्या आहेत. १५ वर्षांपूर्वी झोयाने या गोष्टी कशा कामी येतात ते दाखवलं.

Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
quantum chip Willow solves in 5 minutes
Quantum Chip :सुपर कॉम्प्युटरलाही हजारो वर्षे लागतील; पण गूगलची ‘ही’ नवी चिप ५ मिनिटांत उत्तर देईल
MuleHunter.AI rbi
आता सायबर फ्रॉडचा धोका टळणार; काय आहे ‘आरबीआय’चे ‘MuleHunter.AI’? ते कसे कार्य करणार?
swearing ceremony in Mumbai left many political workers across state despairing
यवतमाळ : मंत्रिमंडळातील समावेशाचा मुहूर्त हुकल्याने महायुतीत अस्वस्थता
Dr Babasaheb Death Anniversary 2024
महामानवाला अभिवादन, दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर लोटला!
article about upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : सद्गुणांवर आधारित नैतिक मांडणी
artificial intelligence helping tackle environmental challenges
कुतूहल :  कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी निसर्गाची जोड

आणखी वाचा : ७ वर्षांनी पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक; ‘या’ चित्रपटासाठी रेकॉर्ड केलं गाणं

या चित्रपटाची मेख त्याच्या क्रेडिट्समध्ये आहे. अगदी आतापर्यंत चित्रपट म्हणजे नायक-नायिका, गाणी, लुटुपूटूची मारामारी एवढंच लोकांना वाटायचं. ३ तासांच्या चित्रपटासाठी मागे किती हात राबतात याचं चित्रण ही क्रेडिट्स करतात. इन्स्टा जनरेशनच्या शब्दात सांगायचं तर ही क्रेडिट्स म्हणजे बीटीएसची गंमत आहे. ओटीटीवर इंट्रो स्किप करायचं बटन असतं. लक बाय चान्सच्या बाबतीत हा चान्स घेऊ नका. ‘सुरुवात चुकवू नका’ हे शब्दश: खरं आहे.

रूढार्थाने ही विक्रम जयसिंग आणि सोना मिश्रा यांची गोष्ट आहे पण बाकीची मंडळीच या गोष्टीत रंग भरतात. ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया या चित्रपटात साचेबद्ध भूमिकेत नाहीत. या दोघांनी चित्रपटाचं मर्म ओळखलं. त्यांचा प्रत्येक सीन आणि संवाद लक्षात राहतो. अनेक मोठे चित्रपट केलेला निर्माता आणि तरुण नायक यांच्यातली जुगलबंदी कमाल आहे. चित्रपटाला नाही कसं म्हटलं जातं याचा डेमोच चित्रपटात आहे. चित्रपट पाहताना एक चित्रपट घडत असतो.

२००९ साली आलेल्या झोयाच्या ‘लक बाय चान्स’ या चित्रपटाला आज १५ वर्षं पूर्ण होत आहेत. हा चित्रपट जसा झोयासाठी खास होता तसाच तो या चित्रपटविश्वासाठीही तितकाच खास होता. ‘रंगीला’मधून राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटविश्वाची एक वेगळी बाजू मांडली अन् त्यानंतर झोयाने तिच्या या ‘लक बाय चान्स’मधून चित्रपटसृष्टीची एक वेगळी बाजू मांडली. दोन्ही चित्रपटातील मुख्य पात्राची गोष्ट, पार्श्वभूमी, प्रवास हा सारखाच पण दोन्ही दिग्दर्शकांच्या दृष्टिकोनातून समोर आलेलं फिल्म इंडस्ट्रीचं चित्र किती भिन्न आहे हे ते चित्रपट पाहिल्यावर चांगलंच लक्षात येतं.

झोया ही प्रसिद्ध लेखक व गीतकार जावेद अख्तर यांची कन्या, तिचा भाऊदेखील याच क्षेत्रात मुरलेला. वडील अन् भावाबरोबर याच क्षेत्रात वाढलेल्या, चित्रपट व्यवसाय जवळून पाहिलेल्या झोया अख्तरने तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांना आणि समीक्षकांना दाखवून दिलं की तिने या क्षेत्राचा किती बारकाईने अभ्यास केला आहे. आजवर घराणेशाही, कंपूशाही यावरून होणारी बरीच चर्चा आपण ऐकली असेल पण या क्षेत्रात राहून चित्रपटसृष्टीचं अचूक चित्रण पडद्यावर मांडणाऱ्या झोया अख्तरच्या क्षमतेवर मात्र कुणीच शंका घेणार नाही.

दिल्लीहून मुंबईत अभिनेता बनण्यासाठी आलेल्या विक्रम जायसिंगची कहाणी झोयाने या चित्रपटातून मांडली. पण ही गोष्ट फक्त त्या एका पात्रापुरतीच मर्यादित न राहता ही इंडस्ट्री नेमकी कशा पद्धतीने काम करते? लाखो तरुण इथे कसा स्ट्रगल करतात? कलाकार आणि दिग्दर्शक सोडले तर ही चित्रपटसृष्टी उभी करण्यात छोट्या छोट्या सहाय्यक मंडळींचा नेमका कसा सिंहाचा वाटा असतो? निर्माते आणि त्यांची मानसिकता कशी असते? कंपूशाही व घराणेशाही नेमकी किती खोलवर पसरलेली आहे? या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या नातेसंबंधात नेमका काय बदल घडतो? अशा वेगवेगळ्या विषयांना झोयाने चित्रपटाच्या माध्यमातून हात घातला. खास गोष्ट म्हणजे या गोष्टी फक्त वरचेवर न दाखवता सामान्य लोकांवर, प्रेक्षकांवर, मध्यमवर्गीय लोकांवर याचा कसा परिणाम होतो हेदेखील झोयाने या चित्रपटातून प्रभावीपणे मांडलं आहे.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच एका गाण्याच्या माध्यमातून चित्रपटाशी निगडीत वेगवेगळ्या डिपार्टमेंट तसेच तंत्रज्ञ यांच्याबद्दल झोयाने ज्यापद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली तिथेच खरंतर तिने निम्मी लढाई जिंकली. याबरोबरच चित्रपट व्यवसायातील बारकावे, त्यामागील गणित, काही जुन्या चाली-रिती, निर्मात्यांचा अंकशास्त्र व ज्योतिषशास्त्र यावर असलेला विश्वास, या सगळ्या गोष्टीदेखील झोयाने फार उत्तमरित्या आणि प्रभावी पद्धतीने मांडल्या होत्या. एक दिग्दर्शिका व लेखिका म्हणून झोयाचं कौतुक तर झालंच पण तिच्या निरीक्षण क्षमतेचेही लोकांनी प्रचंड कौतुक केलं. केवळ या इंडस्ट्रीत लहानाची मोठी झाली म्हणून झोयाला डोक्यावर घेतलं गेलं नाही, तर तिच्या कथा सादर करण्याच्या पद्धतीमुळे आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोनामुळे हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला.

तसं बघायला गेलं तर ‘लक बाय चान्स’ हा पूर्णपणे फिल्म इंडस्ट्रीचाच चित्रपट होता. फरहान अख्तर मुख्य अभिनेता, झोया अख्तर दिग्दर्शिका. यांच्याबरोबरच कोंकणा सेन शर्मा, ऋषी कपूर, जुही चावला, डिंपल कपाडिया, संजय कपूर, ईशा शरवणीसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. याबरोबरच शाहरुख खान, आमिर खान, हृतिक रोशन, अभिषेक बच्चन, करीना कपूर, राणी मुखर्जी, करण जोहर, मनीष मल्होत्रा, रणबीर कपूर, जॉन अब्राहम, विवेक ओबेरॉय, राजकुमार हिरानी, अनुराग कश्यपसारख्या कित्येकांचा कॅमिओदेखील या चित्रपटात होता. चित्रपटसृष्टीतल्याच लोकांनी मिळून या चित्रपटसृष्टीबद्दल काढलेला हा चित्रपट लोकांना का पसंत पडला? कारण त्यामागची भावना, सादरीकरणातील सच्चेपणा यामुळे हा चित्रपट लोकांना जास्त भावला.

या क्षेत्रातच लहानाची मोठी झालेल्या झोयाला या चित्रपटाच्या माध्यमातून एक अत्यंत वेगळं चित्र या चित्रपटसृष्टीचं मांडता आलं असतं. पण झोया तिच्या कथेशी प्रामाणिक होती, चित्रपटसृष्टी आणि त्याभोवतालची इकोसिस्टम कशाप्रकारे काम करते हे झोयाने कोणताही आडपडदा न ठेवता लोकांसमोर सादर केलं. इतकंच नव्हे तर फेम, स्टारडम मिळाल्यावर पूर्वायुष्याचा, जुन्या नातेसंबंधाचा, मित्रांचा आपल्याला विसर पडता कामा नये हा सुंदर संदेशही झोयाने या चित्रपटाच्या माध्यमातून दिला. चित्रपटातील मुख्य पात्र विक्रम जयसिंहला स्ट्रगल केल्यानंतर एक मोठा चित्रपट हाती लागतो अन् हळूहळू स्टारडम अनुभवायला लागतो तेव्हा नकळत त्याच्याकडून जुनी नाती, मित्र, परिवार यांच्याकडे दुर्लक्ष होतं. तेव्हा क्लबमध्ये भेटलेला किंग खान शाहरुख खान त्याला एक मोलाचा सल्ला देतो तो म्हणजे, “उन्हे मत भुलो जो तुम्हे तबसे जानते है जब तुम कुछ नहीं थे, क्यूकी सिर्फ यहीं लोग है जो हमेशा तुमसे सच कहेंगे.” याच संपूर्ण संवादात झोयाच्या ‘लक बाय चान्स’चं सार दडलं आहे. दिग्दर्शिका म्हणून पदार्पणातच इतका परिपक्व चित्रपट देणाऱ्या झोया अख्तरचे कौतुक करावे तितके कमीच आहे.

Story img Loader