अभिनेता अनिल कपूर आणि सनी देओल दोघेही आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. अभिनयाच्या जोरावर दोघांनीही बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. एके काळी दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती. मात्र, एका चित्रपटादरम्यान झालेल्या वादावरून दोघांचे नाते बिघडले आणि मैत्रीच्या नात्याचे रूपांतर शत्रुत्वामध्ये झाले. एक सीन शूट करीत असताना दोघांमध्ये एवढा मोठा वाद झाला की रागाच्या भरात सनी देओलने अनिल कपूरचा गळा पकडला होता. नेमके काय घडले होते त्या वेळेस जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटातील एका दृश्याच्या शूटिंगदरम्यान अनिल कपूरला ओरडून सनी देओलवर राग काढायचा होता. पण त्या दृश्यादरम्यान अनिल कपूर संपूर्ण वेळ ओरडत राहिला आणि सनी देओलच्या तोंडावर थुंकत राहिला. सनी देओल त्याला वारंवार सांगत होता की असे करू नकोस. पण अनिल कपूरने ते ऐकूनही न ऐकल्यासारखे केले. अखेर सनी देओलचा संयम सुटला आणि त्याने अनिल कपूरची कॉलर पकडली. त्यानंतर दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की तो सोडवण्यासाठी चित्रपटाच्या संपूर्ण युनिटला मधे पडावे लागले.

हेही वाचा- ‘मेट गाला’मध्ये कलाकारांना खायला दिले विचित्र पदार्थ; यादी आली समोर

‘इन्तकाम’च्या आधी मे १९८८ मध्येच दोघांचा ‘राम अवतार’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटादरम्यानही दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. शूटिंगदरम्यान सनी देओल जाणूनबुजून गळा दाबत असल्याचा आरोप अनिल कपूरने केला होता. पण फाइट मास्टरने सांगितलेली कृती मी करीत असल्याचे सनीने सांगितले. एका फिल्मी वृत्तपत्रात चित्रपटाची जाहिरात प्रसिद्ध झाली तेव्हा अनिल कपूरचे नाव वर आणि आपले नाव खाली पाहून सनी देओल संतापला. या प्रकारानंतर सनी आणि त्याच्या मित्रांनी वृत्तपत्रात जाऊन गोंधळ घातला.

हेही वाचा- Video : प्रियांकाने निक जोनाससमोरच दुसऱ्या अभिनेत्याला केले किस; व्हिडिओ व्हायरल

जेव्हा गोंधळ वाढला, तेव्हा ज्येष्ठ पत्रकार अली पीटर जॉन यांनी सनीला सांगितले की, अनिल कपूर ज्येष्ठ आहेत, म्हणून त्यांचे नाव वर दिले आहे. इतकेच नाही तर सनीने ऑफिसमध्ये गोंधळ घातल्याची तक्रार जॉनने धर्मेंद्र यांच्याकडे केली. यावर धर्मेंद्रने आपल्या मुलाला खडसावले. १९८९ मध्ये दोघांचा ‘जोशिले’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातही दोघांमध्ये तणाव निर्माण झाला असता पण प्रकरण पुढे सरकले नाही. खरे तर एका ट्रेड पेपरमध्ये अनिल कपूरच्या फोटोसमोर सनी देओलचे नाव लिहिले होते, ज्यामुळे धर्मेंद्र चांगलेच संतापले होते. तत्काळ त्या ट्रेड पेपरने आपली चूक सुधारली आणि माफीही मागितली होती.