सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट ‘फायटर’ २५ जानेवारीला म्हणजेच अवघ्या तीन दिवसांत रीलिज होणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, हृतिक रोशन व अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. फायटर या चित्रपटाने रीलिज होण्याआधीच बक्कळ कमाई केली आहे. हा चित्रपट हवाई दलावर आधारित असून, तो प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रीलिज करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनुसार, ‘फायटर’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी आगाऊ बुकिंगद्वारे २.८४ कोटी इतकी कमाई केली. पहिल्या दिवसासाठी ८६,५१६ तिकिटांची विक्री झाली. तर टूडी हिंदी व्हर्जनसाठी ३३, ६२४ आणि थ्रीडी व्हर्जनसाठी ४६,७९० एवढ्या तिकिटांची विक्री झाली आहे. आयमॅक्स थ्रीडी अ‍ॅक्शनसाठी ४,८८१ आणि फोरडीएक्स थ्रीडीसाठी १२२१ तिकिटांची विक्री झाली आहे.

हेही वाचा… शाहरुख खानबरोबर वादाच्या चर्चा, ‘दिलवाले’नंतर एकत्र काम न करण्याबाबत रोहित शेट्टी म्हणाला…

प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, या चित्रपटाचे सर्वाधिक आगाऊ तिकीट बुकिंग महाराष्ट्रात झाले आहे. महाराष्ट्रात ७५.०२ लाख रुपयांची तिकिटे विकली गेली आहेत. दिल्लीत ६७.३९ लाख रुपये, तेलंगणात ४०.७३ लाख रुपये व कर्नाटकमध्ये ४३.५४ लाख रुपये तिकिटांची विक्री झाली आहे.

भारतीय हवाई दलाच्या कॅडेट्सनी या चित्रपटासाठी काम केले आहे. या चित्रपटात २०१९ पुलवामा हल्ला, २०१९ बालाकोट हवाई हल्ला व २०१९ भारत-पाकिस्तान सीमा चकमकींचा संदर्भ घेण्यात आला आहे. हा चित्रपट हवाई हल्ल्यांवर आधारित असून, दहशतवादी कारवाया हाताळण्यासाठी हवाई मुख्यालय नियुक्त केले जाते. या युनिटमध्ये भारतीय हवाई दलातील सर्वोत्तम लढाऊ वैमानिक निवड केली गेलेली असते; जे शत्रूंवर हल्ला आणि प्रतिहल्ला करू शकतात.

हेही वाचा… मुलीच्या लग्नानंतर आमिर खान दुसऱ्या पत्नीबरोबर रोड ट्रीपवर; किरण रावने शेअर केलेले फोटो चर्चेत

या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण हे मुख्य भूमिकांत असून, अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सहायक भूमिकेत करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, तलत अजीज दिसणार आहेत. हा चित्रपट २५ जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.