बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता हृतिक रोशनचा बहुचर्चित ‘फायटर’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा असलेल्या ‘फायटर’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. यात चित्रपटातील सर्व कलाकारांचा लूक समोर आला आहे.
दीपिका पदुकोणने स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधत ‘फायटर’ चित्रपटाचा टीझर व्हिडीओ शेअर केला आहे. याची सुरुवात आकाशात उडणाऱ्या लढाऊ विमानाने होते. त्यानंतर यात सुरुवातीला हृतिक रोशनची झलक पाहायला मिळते. त्यापाठोपाठ दीपिका पदुकोण, अनिल कपूर यांचीही पहिली झलक यात समोर आली आहे.
आणखी वाचा : जबरदस्त बॉडी अन् बायसेप्स, हृतिकचा ‘फायटर’ लूक पाहिलात का?
‘फायटर’ चित्रपटातील या तिघांचा लूक फारच जबरदस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचा हा लूक पाहून चाहते त्यांचं कौतुक करताना दिसत आहे.
दरम्यान ‘फायटर’ या चित्रपटाची घोषणा १० जानेवारी २०२१ रोजी करण्यात आली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करण्यात आली. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण हे दोघेही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्याबरोबरच या चित्रपटात अनिल कपूरही झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.