करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘गली बॉय’सारख्या सुपरहीट चित्रपटानंतर ही जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता. या प्रीमियर शोला काही बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

प्रीमियरला हजर असलेल्या बऱ्याच लोकांना हा चित्रपट प्रचंड आवडला. त्याबद्दल त्यांनी प्रतिक्रियाही दिली. प्रसिद्ध समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनीदेखील या प्रीमियरला हजेरी लावली होती. नुकतंच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून या चित्रपटाचं एका शब्दात समीक्षण करत त्याला रेटिंग दिलं आहे.

Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मृणालने ठाकूरनं 'पाणी' सिनेमाच्या टीमचं कौतुक केलं आहे. (Mrunal Thakur/ Instagram)
मृणाल ठाकूरनं ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याचं केलं कौतुक; पोस्ट शेअर करत म्हणाली, “राष्ट्रीय पुरस्कारासाठी तुम्ही…”
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
Fans and netizens reaction on tejashri Pradhan exit from premachi goshta serial
“खूप वाईट वाटतंय..”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील तेजश्री प्रधानच्या एक्झिटवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “तुझा निर्णय…”
Swapnil Joshi and Prasad Oak opinion that story is important actors are secondary at Jilbi trailer launch
“कथा मुख्य, कलाकार दुय्यम”, ‘जिलबी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांचे मत
Navri MIle Hitlarla
Video : “तू या लूकमध्येसुद्धा…”, सुनांचा डाव फसणार, लीलाचा धांदरटपणा एजेंना आवडणार; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “एक नंबर एजे”
Marathi Actor Shubhankar Ekbote Meets Aamir Khan
“जन्म १९९४, पहिला चित्रपट पाहिला…”, मराठी अभिनेत्याचं नाटक पाहायला आला आमिर खान! भलीमोठी पोस्ट लिहित सांगितला अनुभव

आणखी वाचा : राजेश खन्ना यांच्या निधनानंतर नसीरुद्दीन शाह यांनी केलेली टीका; सुपरस्टारला म्हणाले ‘फालतू अभिनेता’

तरण आदर्श यांना हा चित्रपट प्रचंड आवडला असून त्यांनी या चित्रपटाला ४ स्टार रेटिंग दिलं आहे. चित्रपटातील नाट्य, रोमान्स, ड्रामा, संगीत, सगळ्याच गोष्टींचं कौतुक तरण आदर्श यानी केलं असून त्यांना या चित्रपटाचं समीक्षण एका शब्दात ‘टेरीफीक’ असं केलं आहे. याबरोबरच त्यांनी रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या कामाचीही प्रशंसा केली आहे.

सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री जया बच्चन, अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. करण जोहर बऱ्याच वर्षांनी पुन्हा दिग्दर्शनात कमबॅक करत असल्याने त्याच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे. एकूणच लोकांची प्रतिक्रिया आणि समीक्षकांनी केलेलं कौतुक पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Story img Loader