बॉलीवूडमधून एक दुखःद बातमी आली आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरहिट चित्रपटांचं एडिटिंग करणारे संजय वर्मा यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला जात आहे. ते इंडस्ट्रीमधील अनेक मोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम करणाऱ्या प्रसिद्ध एडिटर्सपैकी एक होते. ते साउंड डिझायनरही होते. ते त्यांच्या उत्तम कामामुळे राकेश रोशनपासून अनेक दिग्गज दिग्दर्शकांचे आवडते एडिटर होते.
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन
संजय वर्मा यांनी हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला ‘कोई मिल गया’, सलमान-शाहरुखचा ‘करण अर्जुन’, रेखा यांचा ‘खून भरी मांग’ यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे एडिटिंग केले होते. याशिवाय त्यांनी ‘कागज’, ‘कौन मेरा कौन तेरा’, ‘कयामत से कयामत तक’, ‘मिलेंगे मिलेंगे’ ते ‘कल किसने देखा’सह ५२ हून अधिक चित्रपटांसाठी काम केलं होतं.
निधनाच्या एक दिवस आधी त्यांच्या चित्रपटाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
संजय वर्मा यांच्या निधनाच्या एक दिवस आधी त्यांच्या शेवटच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘द लास्ट शो’ ला सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा २०२१ मध्ये आलेला गुजराती चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पान नलिन यांनी केले होते. ऑस्करसाठीही हा चित्रपट शॉर्टलिस्ट झाला होता.