मलायका अरोरा ही बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे, जी तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे चर्चेत असते. सध्या मलायकाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये फिल्ममेकर रितेश सिधवानी बायकोच्या ऐवजी चुकून मलायका अरोराचा हात धरताना दिसत आहे.

हेही वाचा- दारूच्या नशेत स्वरा भास्करने शाहरुख खानला दिला होता त्रास; अभिनेत्रीने स्वत: सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “मी सगळ्यांसमोर..”

काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा रितेश सिधवानी आणि त्याची पत्नी डॉली सिधवानीसोबत डिनर एन्जॉय करताना दिसली होती. याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे. रितेशने पत्नी डॉलीऐवजी मलायका अरोराचा हात चुकून पकडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तो फोनवर कोणाशी तरी बोलत आहे, मलायका त्याच्या मागे उभी आहे आणि नंतर डॉली. रितेशने लक्ष न देता मलायकाचा हात धरला. पण जेव्हा त्याच्या हे लक्षात आलं. तेव्हा त्याने मलायकाचा हाथ सोडत आपल्या पत्नीचा हात पकडला. मलायका अरोरा तिथून शांतपणे निघून गेली आणि कारमध्ये बसून डॉलीसोबत हसायला लागली.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओत मलायका सॅटिन साइड कट वन शोल्डर ड्रेस घातला होता. हातात छोटी हँडबॅगने होती. थोडा मेकअप आणि पोनीटेलमध्ये ती ग्लॅमरस दिसत होती. मलायका आणि रितेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

व्हिडीओ बघून नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग

या व्हिडीओवर नेटकरी मोठ्यात प्रमाणात कमेंट करत आहे. एका यूजरने लिहिले की, “हे चुका करण्याचे वय आहे.” एका नेटिझनने लिहिले की, “वेळेसोबत माणूस शिकतो.” एकजण म्हणाला, “गलती से गलती हो गई, लेकीन दिल बगीचा हो गया भाईसाब का.” याशिवाय अनेक लोक त्याच्या या व्हिडीओची खिल्ली उडवत आहेत.

Story img Loader