Sholay’s Deleted Scene: ‘शोले’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील, तसेच रमेश सिप्पी यांच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा चित्रपट मानला जातो. १९७५ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे बजेट तीन कोटी रुपये होते आणि इतर कमाई ३५ कोटींची झालेली.

या चित्रपटातील बरेच सीन्स आजही लोकांच्या मनात ठाण मांडून आहेत. या चित्रपटातील एक सीन अजूनही लोकांना आवडतो. चित्रपटात संजीव कुमार यांनी साकारलेले ठाकूर बलदेव सिंगचे पात्र लोकांना आवडले. अलीकडेच एका डिलीट केलेल्या सीनचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये संजीव कुमार आपल्या बुटात खिळे ठोकून घेताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जेव्हा जेव्हा ही जोडी पडद्यावर आली तेव्हा तेव्हा ती हिट ठरली. दोघेही १९७५ मध्ये ‘शोले’मध्ये दिसले होते. हा चित्रपट जुना झाला असला तरी आजही लोकांना तो पाहायला आवडतो. आता त्याच चित्रपटातील एक मनोरंजक सीन व्हायरल होत आहे, जो चित्रपटातून डिलीट करण्यात आला होता.

ठाकूरने बनवले होते खिळ्यांचे बूट

चित्रपटातील एक सीन समोर आला आहे, ज्यामध्ये ठाकूर म्हणजेच संजीव कुमार त्याच्या घराबाहेर बसून चर्मकाराकडून त्याच्या बुटांना खिळे ठोकून घेत आहे. ठाकूर ज्या बुटाने गब्बरला मारतो, त्या बुटाच्या मागच्या बाजूला चर्मकार खिळे ठोकतो. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये ठाकूर आणि गब्बर सिंग यांच्यामध्ये मारामारी दाखवण्यात आली आहे. या सीनमध्ये दिसणारे बूट देखील चित्रपटात महत्त्वाचे म्हणून दाखवण्यात आले आहेत.

‘शोले’चा हा व्हिडीओ समोर आल्यानतंर प्रचंड व्हायरल झाला आहे. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. १९७५ मधील हा चित्रपट त्यावेळी लोक जितक्या आवडीने पाहत होते, तितक्याच आवडीने आणि उत्सुकतेने आजही बरेच लोक हा चित्रपट पाहतात.