‘तुंबाड’साठी सोहम शाहने फ्लॅट, प्रॉपर्टी आणि शेवटी कारही विकली होती..’तुंबाड’ या सिनेमाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. हा सिनेमा तयार होणं म्हणजे एक प्रवास होता. हा सिनेमा तयार करण्यासाठी सात वर्षे लागली होती. या सिनेमाचे निर्माते आणि अभिनेते सोहम शाह यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्याच्या हातातून काही प्रोजेक्ट गेलेही. तसंच या सिनेमासाठी शेवटी सोहमला कारही विकावी लागली होती. सोहम शाहनेच हा किस्सा सांगितला.

तुंबाड हा हॉरर चित्रपट नाही

सोहम शाह यांना जेव्हा तुंबाड विषयी विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, मी या सिनेमाला हॉरर सिनेमा मानत नाही. तुंबाड हा एका अनोख्या विषयावरचा सिनेमा आहे. यामध्ये प्रेम, लालसा असे पैलू आहेत. संपूर्णपणे हा हॉरर सिनेमा आहे असं मला वाटत नाही. आपल्याला आपली आजी जशी गोष्ट सांगायची तसा हा सिनेमा मला वाटतो. मला कायमच अशा गोष्टी आवडतात. आपल्या देशात आजीने सांगितलेल्या गोष्टी नाही चालणार तर मग काय चालणार? असंही सोहम शाह म्हणाला. आज तकला दिलेल्या मुलाखतीत सोहम शाहने हे वक्तव्य केलं आहे. तुंबाड या सिनेमाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्याच्याशी जो संवाद साधण्यात आला त्यावेळी त्याने या सिनेमाच्या प्रवासाविषयी सांगितलं.

Shahid Afriadi breaks silence on relationship rumours with Sonali Bendre
सोनाली बेंद्रेबरोबरच्या अफेअरबद्दल विचारताच पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणाला, “आता आम्ही…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
aamir khan, shah rukh khan, salman khan
सलमान खान आणि शाहरुख खानबरोबर एकत्र काम करण्याच्या चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया; म्हणाला, “आशा आहे लवकरच…”
Hina Khan
कर्करोगाशी झुंज देणाऱ्या हीना खानने शेअर केले रुग्णालयातील फोटो; म्हणाली, “उपचाराच्या या ठिकाणी…”
Manoj Bajpayee
‘या’ प्रसिद्ध चित्रपटाच्या दिग्दर्शकाबरोबर मनोज वाजपेयी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार; म्हणाले, “आनंदाची बातमी…”
Shahrukh Khan
अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुख खानच्या चित्रपटात गाणे बंद का केले? गायक खुलासा करत म्हणाले, “जेव्हा स्वाभिमान…”

प्रेक्षकांच्या प्रतिसादाने भारावलो

या सिनेमाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील? याविषयी मी थोडासा साशंक होतो. मी या सिनेमासाठी माझ्या करिअरची सात वर्षे दिली आहेत. एक वेळ तर अशीही आली होती की मला वाटलं होतं की हा सिनेमा आपण आता बंद करु. पण मला मनातली उर्मी सांगत होती की नाही आपण हा सिनेमा तयार केलाच पाहिजे. मी एक अभिनेता म्हणून अनेक प्रोजेक्ट्सना या सिनेमाच्या निर्मितीसाठी नकार दिला. मी तुंबाड सिनेमाला माझा पूर्ण वेळ दिला. आज पाच वर्षांनीही या सिनेमाची चर्चा होते आहे त्याचा मला आनंद होतो आहे.

सात वर्षात अनेक अडचणी आल्या

तुंबाडच्या निर्मितीची जी सात वर्षे होती त्या सात वर्षांत मला बरीच आर्थिक कसरत करावी लागली. स्वीडनच्या वीएफएक्स टेक्निकलच्या लोकांशी आम्ही बोलत होतो. त्यांना आधी फ्रॉड वाटलो होतो त्यांना पैसे देणार नाही असंही वाटलं होतं. मी जवळपास सहा महिने त्या माणसाच्या संपर्कात होतो आणि त्याला हे पटवून दिलं की आम्ही खरंच सिनेमा तयार करणार आहोत. त्याला अॅडव्हान्सही दिला. ज्यानंतर त्याने या सिनेमासाठी काम केलं. आम्ही सगळं शूटिंग फक्त पावसातच केलं होतं. त्यामुळे सिनेमा एडिट केल्यानंतरही तो साडेतीन तासांचा झाला होता. त्याची लांबी कमी करण्याचं आव्हान होतं. शिवाय इतरही आव्हानं होतीच. अनेक छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या आव्हानांनाही आम्ही तोंड दिलं. शेवटची तीन वर्षे अशी होती ज्यात मी, आमच्या दिग्दर्शक, माझे सह-दिग्दर्शक आणि एडिटर प्रणव ठक्कर आम्ही चौघेच या सिनेमावर काम करत होतो.

मी माझं घर, प्रॉपर्टी आणि कारही विकली

सिनेमा तयार होता होता माझं दिवाळं निघालं होतं कारण या सात वर्षांमध्ये मी माझा फ्लॅट विकला, प्रॉपर्टी विकली एक वेळ अशी आली की मी माझी कारही विकली होती. मी लहान असताना ऐकलं होतं की राज कपूर यांनी सिनेमासाठी घर विकलं होतं. त्यावेळी मला वाटायचं की बातमी अशीच कुणीतरी गॉसिप म्हणून दिली असावी. पण सिनेमा निर्मितीच्या प्रक्रियेत मला ती गोष्ट पटली असंही सोहम शाहने सांगितलं.

Story img Loader