अभिनेत्री अमृता सुभाषने मराठीसह बॉलीवूड चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही वर्षांत तिने ‘लस्ट स्टोरीज’, ‘गली बॉय’, ‘शास्त्री विरुद्ध शास्त्री’ अशा एकापेक्षा एक दमदार बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला अमृताने तिचे पती संदेश कुलकर्णींसह हजेरी लावली होती. याची खास पोस्ट अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलीवूडमध्ये प्रतिष्ठित मानला जाणारा ६९ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २८ जानेवारीला गुजरातमध्ये पार पडला. अमृता सुभाषने या सोहळ्यासाठी खास गुजराती साडी नेसली होती. ही साडी अमृताला अभिनेत्री अश्विनी गिरीने गिफ्ट दिली होती. याशिवाय फिल्मफेअरमध्ये दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा बहुमान अमृताला मिळाला. याबद्दल तिने खास पोस्ट शेअर करत आपला अनुभव सांगितला आहे.

अमृता सुभाष लिहिते, “लहान असताना जेव्हा शबानजींची अनेक कामं डोळ्यात प्राण आणून पाहिली, ज्याचं मंडीमधलं पात्र पाहून, त्यात त्यांनी घेतलेला बोलण्याचा लहेजा, त्या भूमिकेसाठी त्यांनी वाढवलेलं वजन, बदललेली देहबोली हे पाहून मी थक्क झाले होते. त्यांना पुरस्कार देण्याची मोलाची संधी फिल्मफेअरनं मला दिली याबद्दल मी कृतज्ञ आहे.”

हेही वाचा : ‘पठाण’अगोदर शाहरुखने चार वर्षांचा ब्रेक का घेतला होता? कारण सांगत अभिनेता म्हणाला, “गेली ३३ वर्ष…”

“जी स्वप्नं आपण पाहतो ती सत्यात उतरली की किती आनंद होतो, पण ज्याची आपण स्वप्नातही कल्पना केली नव्हती ते जेव्हा असं सत्यात उतरतं तेव्हा शब्द मुके होऊन जातात. त्या शब्दातीत अनुभवाला शब्दात पकडण्याचा प्रयत्न मी त्या प्रसंगी जे बोलले त्यात केला. या प्रसंगी मी नेसलेली ही साडी माझी मैत्रीण आणि एक सच्ची कलाकार अश्विनी गिरीनं मला भेट दिली आहे. अश्विनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील माझी सिनिअर. तिनं माझ्या कामाचं कौतुक म्हणून दिलेली ही साडी या सुंदर प्रसंगी नेसता आली याचा आनंद वेगळाच! कार्यक्रम गुजरात मध्ये होता म्हणून खास गुजराती स्टाइल मध्ये!” असं अमृताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : “गांधीजींनी एका हिंदू भजनात ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ हे शब्द टाकून…”, विवेक अग्निहोत्रींची पोस्ट; म्हणाले, “त्यांचे शेवटचे शब्द…”

दरम्यान, अमृता सुभाषने शेअर केलेल्या पोस्टवर असंख्य नेटकऱ्यांनी कमेंट्स पाऊस पाडला आहे. अभिनेत्रीने मराठीसह बॉलीवूडमध्ये ओळख निर्माण केल्याने सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Filmfare awards news amruta subhash felicitate shabana azmi in filmfare 2024 award show sva 00