सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फोटोंचाही समावेश असतो. या सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटो किंवा त्यांचा चेहरा स्पष्ट ओळखता येत नसेल, असे फोटो व्हायरल होतात. त्यावरून नेटकरी ते फोटो कोणाचे आहेत, हे ओळखण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एक फोटो चर्चेत आहे. एका अभिनेत्याचा पाठमोरा फोटो व्हायरल होत आहे आणि तो कोण आहे, हे ओळखण्याचा नेटकरी प्रयत्न करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘फिल्मफेअर’च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर करण्यात आला आहे आणि ‘ओळखा पाहू कोण’? असं कॅप्शन त्यावर देण्यात आलंय. फोटोतील अभिनेत्याचे केस कुरळे आहेत आणि त्याने स्लीव्हलेस जॅकेट घातलंय. त्याची तगडी शरीरयष्टी या फोटोमध्ये पाहायला मिळत आहेत. दरम्यान, या फोटोवर चाहत्यांनी तो हृतिक रोशन आहे, टायगर श्रॉफ आहे, अक्षय कुमार आहे, अजय देवगण, आदित्य रॉय कपूर आणि विकी कौशल असल्याचं म्हटलंय.

हा फोटो अभिनेता टायगर श्रॉफचा आहे. टायगरने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यातलाच हा फोटो आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘गणपत’मधील हा फोटो असल्याच्या कमेंट्स त्याच्या चाहत्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, ‘गणपत’चा टिजर, ट्रेलर कधी प्रदर्शित होईल, असे प्रश्न चाहत्यांनी टायगरला कमेंट सेक्शनमध्ये विचारले आहेत. टायगर सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Filmfare shared tiger shroff photo ganapath movie know details hrc