आजकाल बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये बडे अभिनेते पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहेत. नुकताच बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून झळकला होता. आता अभिनेत्रीदेखील यात मागे नाहीत. अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील आगामी चित्रपटात एका गाण्यात आपल्याला दिसणार आहे.

आपल्या सौंदर्याने, अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी श्रद्धा कपूर आता ‘भेडिया’ चित्रपटातील एका गाण्यात दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘ठुमकेश्वरी’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात क्रितीच्या बरोबरीने श्रद्धादेखील ठुमके लावताना दिसत आहे. या गाण्यात वरुण धवनदेखील दिसत आहे. हे गाणे गीतकार अमिताभ भट्टाचार्य याने लिहले असून सचिन जिगर यांनी संगीतबद्ध तसेच गाणे गायले देखील आहे. सध्या या गाण्याची हवा आहे. बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींना एकत्र पाहता येणार आहे.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…
kumar vishwas
कुमार विश्वास यांनी सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय विवाहावर केली टिप्पणी; काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या…
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
Madhurani Prabhulkar
Video : “खंत वाटली…”, मधुराणी प्रभुलकरने कुलाबा किल्ल्याला भेट दिल्यानंतर व्यक्त केल्या भावना; म्हणाली, “कुणी गांभीर्याने…”

आणखी वाचा : ‘कांतारा’ स्टार रिषभ शेट्टीने घेतली भूमिकेसाठी विशेष मेहनत; म्हणाला, “मी २०-३० दिवस मांसाहार…”

दिनेश विजन यांच्या या नव्या ‘भूतलोक’मध्ये आता श्रद्धाची एंट्रीसुद्धा होणार आहे. केवळ श्रद्धाच नव्हे तर जान्हवी कपूरची म्हणजेच ‘स्त्री’ आणि ‘रूही’ या दोघींची एंट्री या ‘भेडीया’मध्ये होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्यातली श्रद्धाची झलक पाहून सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. ‘भेडीया’च्या दिग्दर्शनानंतर अमर कौशिक आयुष्मान खुरानाबरोबर ‘वैंपायर’ हा चित्रपटही करणार आहेत. यामध्ये आयुष्मानबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभूही झळकणार आहे.

‘भेडीया’नंतर आता ‘स्त्री २’ची चर्चा होत आहे. अभिनेता राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरदेखील यासाठी तयारी करत आहेत. आता ‘स्त्री २’मध्ये ही सगळी पात्रं पुन्हा दिसणार असल्याचा इशाराही चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिला आहे. ‘भेडिया’ हा दिग्दर्शक अमर कौशिक यांचा हा तिसरा चित्रपट आहे. याआधी त्यांनी राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री’ आणि आयुष्मान खुरानाच्या ‘बाला’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. प्रेक्षकांनी या दोन्ही चित्रपटांना उदंड प्रतिसाद दिला होता. हा चित्रपट २५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader