मागच्या काही वर्षांत बॉलीवूड चित्रपटांच्या कमाईचे आकडे १००, २००, ३०० कोटी ते अगदी १००० कोटींवर गेले आहेत. आताही चित्रपट १०० कोटींपेक्षा जास्त कमाई सहज करतात. पण ४२ वर्षांपूर्वी एका दोन कोटींमध्ये निर्माण झालेल्या चित्रपटाने १०० कोटींची कमाई करत विक्रम रचला होता.

१०० कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट मिथुन चक्रवर्ती यांचा होता. १९८२ साली आलेल्या ‘डिस्को डांसर’ सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवलं आणि या चित्रपटाची गाणीही सुपरहिट ठरली होती. ‘आय अॅम अ डिस्को डांसर’, ‘जिम्मी जिम्मी आजा आजा’, ‘याद आ रहा है…तेरा प्यार’ ही सुपरहिट गाणी तुम्ही ऐकली असतीलच. ही गाणी आजही आपल्या कानावर पडते. ही सर्व गाणी ‘डिस्को डांसर’ या चित्रपटातील आहेत. या चित्रपटा दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची मुख्य भूमिका होती.

“IIT मध्ये पहिल्याच दिवशी ज्युनिअरने स्वतःला संपवलं,” ‘कोटा फॅक्टरी’च्या जितेंद्र कुमारने सांगितला खऱ्या आयुष्यातला अनुभव

‘डिस्को डांसर’चे बजेट व बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार, ‘डिस्को डांसर’ चित्रपटाचे बजेट फक्त दोन कोटी रुपये होते, पण या चित्रपटाने जगभरात तब्बल १०० कोटी रुपयांची कमाई केली होती. हा हिंदी चित्रपटसृष्टीत १०० कोटी रुपयांची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला. हा या चित्रपटाचा सर्वात मोठा विक्रम होता. त्या काळी या चित्रपटाला व त्यातील गाण्यांना फक्त भारतातच नाही, तर विदेशातही लोकप्रियता मिळाली होती.

ऐश्वर्या रायच्या को-स्टारच्या वैवाहिक आयुष्यात वादळ?अभिनेत्याच्या पत्नीने डिलीट केले फोटो, १५ वर्षांपूर्वी केला प्रेमविवाह

बब्बर सुभाष यांनी या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती. या चित्रपटात मुख्य भूमिकेत मिथुन चक्रवर्ती होते. तसेच कल्पना अय्यर, हीता सिद्धार्थ, मास्टर छोटू, ओम पुरी या कलाकारांनी यात महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाचं संगीत बप्पी लहरी यांनी दिलं होतं. या चित्रपटाची सर्व गाणी बप्पी लहरी व उषा उथूप यांनी गायली होती. हा चित्रपट तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स व प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

“तिचे खूप उपकार, तिच्यामुळेच करिअर करू शकलो”; नाना पाटेकर यांचं पत्नीबद्दल वक्तव्य, वेगळं राहण्याबाबत म्हणाले…

‘डिस्को डांसर’ चित्रपटाची गोष्ट

यात मिथुन चक्रवर्ती यांनी अनिल नावाची भूमिका केली आहे. अनिलचं डिस्को डांसर बनण्याचं स्वप्न आणि त्यात आडकाठी येत असलेली त्याची आर्थिक परिस्थिती हे या चित्रपटात पाहायला मिळते. त्याच्या आईवर चोरीचा आरोप लागतो आणि ती तुरुंगात पोहोचते. खूप वर्षांच्या संघर्षानंतर अनिलचं स्वप्न पूर्ण झाल्यावर तो आईचा गमावलेला सन्मान परत मिळवून देतो. पण हे सगळं करताना त्याची लोकप्रियता अडचणीची ठरते. ४२ वर्षांपूर्वी आलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळालं की नंतर मिथुन चक्रवर्तींना डिस्को डांसरचा टॅग देण्यात आला.