आजच्या घडीला बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेते म्हणजे पंकज त्रिपाठी. एक बहुआयामी अभिनेते अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. कधी विनोदी, कधी संवेदनशील, भूमिका तर कधी नकारात्मक भूमिकेमध्येही ते दिसले. आता सध्या ते त्यांच्या आगामी अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकमुळे चर्चेत आहेत. आज अखेर या चित्रपटातील त्यांचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेले अनेक महिने पंकज त्रिपाठी या चित्रपटासाठी मेहनत घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी एक पोस्ट शेअर करत या चित्रपटात काम करताना त्यांना कसं वाटतंय हे सांगितलं होतं. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हंटलं होतं की, “खूप उत्साह थोडी भीती, मनामध्ये अनेक भाव मात्र निष्ठा पक्की, अटलजींच्या भूमिकेसाठी हे समर्पित, आता मी अटल आहे. अटलजींसारखे व्यक्तिमत्व पडद्यावर साकारणं कुठल्या ही परीक्षेपेक्षा कमी नाही, मात्र या परीक्षेत त्यांचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे.” त्यामुळे या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक पाहण्यासाठी सर्वजण आतुर झाले होते.

आणखी वाचा : २० वर्षीय तुनिषा शर्माच्या नावे कोट्यवधींची संपत्ती, आकडा ऐकून व्हाल थक्क

या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत या चित्रपटातील पंकज त्रिपाठी यांची पहिली झलक दाखवली. मी जाधव यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या वेशभूषेमध्ये दिसत असून पंतप्रधान, कवी, राजकारणी, उत्कृष्ट माणूस अशा विविध बाजू फोटोंच्या माध्यमातून उलगडत आहेत. तर हा व्हिडीओ सुरु असताना ‘मैं अटल हूँ’ या चित्रपटाचं गाणं ऐकू येत आहे.

हेही वाचा : अभिनेते पंकज त्रिपाठींचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “पैसा आणि प्रसिद्धीसाठी…”

‘द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अ‍ॅण्ड पॅराडॉक्स’ या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. डिसेंबर २०२३ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First look of panjak tripathi from main atal hoon film is out rnv