First Photo of Saif Ali Khan Attacker : सैफ अली खानवर आज (१६ जानेवारीला) मध्यरात्री चोरट्याने हल्ला केला. या घटनेत अभिनेता गंभीर जखमी झाला आहे. सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. आता या प्रकरणातील एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्याचा पहिला फोटो पोलिसांनी प्रसारित केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा आरोपी पायऱ्यांवरून खाली उतरताना कैद झाला. या सीसीटीव्ही फुटेजमधील एक फोटो पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. आरोपी मध्यरात्री २ वाजून ३३ मिनिटं व ५६ सेकंदांनी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आरोपीबद्दल अधिक माहिती अजून आलेली नाही.

bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “कधी कधी काही घटना घडतात, पण…”; मुंबईत सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
Saif Ali Khan attacked by intruder at bandra home
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, वांद्रेतील घरात मध्यरात्री घडली घटना
ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Police Suspects Saif Ali Khan House Helper knew Attacker
हल्लेखोराला ओळखत होती सैफ अली खानची मदतनीस, पोलिसांना संशय; दोन तासांच्या CCTV फुटेजमध्ये…
Saif Ali Khan attacker identified says police
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, पोलिसांची माहिती; चोरटा घरात नेमका कसा शिरला? जाणून घ्या

हेही वाचा – सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, पोलिसांची माहिती; चोरटा घरात नेमका कसा शिरला? जाणून घ्या

पाहा फोटो –

सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या तपासात असं दिसतंय की हल्लेखोराने चोरीच्या उद्देशाने इमारतीच्या फायर एस्केप पायऱ्यांचा वापर करून सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला होता. ही घटना मध्यरात्री अडीच वाजता घडली. चोरट्याला पाहून घरातील मदतनीसने आरडाओरडा करत मदतीसाठी अलार्म वाजवला. यानंतर सैफ अली खान खोलीत गेला, तिथे त्याची चोरट्याबरोबर झटापट झाली, यादरम्यान त्याने सैफवर सहा वेळा चाकूने वार केले. तसेच घरातील मदतनीसही जखमी झाली आहे, तिच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर घुसखोर घटनास्थळावरून पळून गेला आणि त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी १० पथके तयार केली आहेत.

हेही वाचा – चोराने सैफवर हल्ला केल्यावर ‘हे’ दोघे पोहोचले मदतीला; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात

आरोपीचा पहिला फोटो पोलिसांनी प्रसारित केला असला तरी अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांची पथकं आरोपीचा शोध घेत आहेत. या आरोपीने केलेल्या हल्ल्यात सैफ व त्याच्या घरातील मदतनीस असे दोघेही जण जखमी झाले. मदतनीस किरकोळ जखमी झाल्याने तिला उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. दुसरीकडे सैफ गंभीर जखमी असल्याने अद्याप लीलावती रुग्णालयात आहे.

Story img Loader