आमिर खानची मुलगी आयरा खान व तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यांनी ३ जानेवारी २०२४ रोजी नोंदणी पद्धतीने विवाह केला. आता पारंपरिक पद्धतीने त्यांचं लग्न राजस्थानमधील उदयपूर इथे होणार आहे. या लग्नासाठी खान व शिखरे कुटुंबियांसह नवविवाहित जोडप्याची मित्रमंडळी सर्वजण उदयपूरला पोहोचले आहे. आयराने उदयपूरमधून लग्नानंतरची पहिली सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयरा खानने आज (६ जानेवारी) तिच्या इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये तिचा फोटो आहे. “कारण आम्ही ड्रेस-अप ऑल वीक खेळत आहोत,” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. हा फोटो तिची चुलत बहीण जेन मेरीने काढला आहे. या फोटोत आयराने शॉर्ट ड्रेस व जॅकेट घातले आहे.

पती नुपूर शिखरेपेक्षा तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे आयरा खान; आमिर खानची लेक २६ वर्षांची, तर जावई…

आयराने दुसरीही एक पोस्ट शेअर केली आहे. आयराचा पती नुपूर हा फिटनेस ट्रेनर आहे. या फोटोत नुपूर, आयरा, मिथिला पालकर आणि इतर चारजण आहेत. हे सर्वजण वर्कआउट करताना दिसत आहेत. “वर्कआउट्सशिवाय आमचे लग्न होऊ शकते का?”, असं कॅप्शन आयराने या फोटोंना दिलं आहे.

पद्मिनी कोल्हापूरे होणार आजी, सूनेच्या डोहाळे जेवणाचे फोटो चर्चेत, श्रद्धा कपूरच्या मराठी लूकने वेधलं लक्ष

आयराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यामध्ये उपस्थित पाहुणे राजस्थानी कलाकारांबरोबर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओ मराठमोळी मिथिला पालकरदेखील दिसत आहे. मिथिला व आयरा दोघी मैत्रिणी आहेत. नुपूर व आयराच्या नोंदणी विवाहातही मिथिलाने हजेरी लावली होती.

मिथिला पालकर डान्स करताना…

दरम्यान, आयरा व नुपूर यांचे लग्न आंतरधर्मीय आहे. दोघांनी आधी नोंदणी पद्धतीने लग्न केलं आहे. त्यानंतर आता ते पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकतील. ८ जानेवारी रोजी त्यांचं लग्न होणार आहे. यासाठी नुपूर, आयरा, रीना दत्ता, आमिर खान, आझाद व इतर सर्वजण शुक्रवारीच उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First post after wedding ira khan nupur shikhare workout candid photo mithila palkar dance in udaipur hrc