पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची खूप चर्चा झाली. ऑनलाइन गेम ‘PUBG’ खेळताना ती भारतातील सचिन मीनाच्या प्रेमात पडली. सीमा तिच्या प्रेमापोटी ती पतीला सोडून नेपाळमार्गे ग्रेटर नोएडाला आली. तिच्याबरोबर ती स्वतःची चार मुलेही घेऊन आली. सीमाची प्रेमकहाणी बाहेर येताच एकच गहजब पाहायला मिळाला. गेले काही दिवस या दोघांच्या प्रेमकहाणीची चांगलीच चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आता तर या प्रकरणावर ‘कराची टू नोएडा’ असा एक चित्रपटही निघणार आहे. सीमा आणि सचिनच्या प्रेमकहाणीवर चित्रपट बनणार याची चर्चा होतीच पण या सगळ्या गोष्टी एवढ्या पटापट घडतील याची कुणीच कल्पना केली नव्हती. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं असून यातील पहिलं गाणंही २० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : प्रसिद्ध अभिनेत्याचे ‘गदर २’च्या निर्मात्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप; चित्रपटाच्या कलेक्शनही खोटे असल्याचा दावा

अमित जानी हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर भरत सिंह या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर तयार सीमाच भूमिका अभिनेत्री फरहीन फलक निभावणार असल्याचं सांगितलं जात आहे. नुकतंच चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिलं पोस्टर रिलीज करत गाण्याबद्दल माहिती दिली.

सीमा आणि सचिनची प्रेमकहाणी ‘पबजी’ गेमपासून सुरू झाली. गेम खेळत असताना दोघेही संपर्कात आले आणि हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडले. सीमा विवाहित असून तिला चार मुले असूनही हे दोघे फोनवर तासंतास बोलू लागले. त्यानंतर सीमा नेपाळमार्गे भारतात आली. इतकंच नव्हे तर सीमा लवकरच मोठ्या पडद्यावरही झळकणार आहे. एका चित्रपटात सीमाला काम मिळालं असल्याचीही चर्चा आहे.