भारत पाकिस्तान क्रिकेटचा सामना म्हंटल की दोन्ही देशच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे लागून बसते. आज भारतासाठी एक मोठा दिवस आहे कारण टी २० विश्वचषकातील एका महत्वाचा सामना आज होणार आहे. मेलबर्न येथे आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामनात रंगणार आहे. दोन्ही देशातील चाहते या सामन्यासाठी उत्सुक आहेत. या सामन्याची चर्चा रंगात असतानाच सोशल मीडियावर सध्या शाहरुख खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसून येत आहे.
एका शाहरुखच्या चाहत्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे शाहरुख खानचा हा व्हायरल व्हिडिओ २००७ च्या पहिल्या टी २० वर्ल्ड कप फायनलचा आहे. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ धावांनी पराभव केला होता. या ऐतिहासिक सामन्यात किंग खानने हजेरी लावली होती. शाहरुख खानबरोबर त्याचा मुलगादेखील या सामन्यात हजर होता. तेव्हा तो लहान होता. भारतीय संघांच्या ऐतिहासिक विजयानंतर शाहरुख खान आनंद साजरा करताना दिसत आहे.
“खरंच या माणसाला… ” प्रशांत दामलेंबद्दल प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत
हा सामना पाहण्यासाठी एक लाख चाहते येणार असल्याचे सांगितले जात आहे. भूतकाळातील चुकांमधून धडा घेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया भारतीय चाहत्यांना विजयाच्या रूपात दिवाळी भेट देऊ इच्छितात. हा सामना डिझनी प्लस हॉटस्टार सहित स्टार स्पोर्ट्सच्या वाहिन्यांवर प्रक्षेपित केला जात आहे.
दरम्यान शाहरुख खान सध्या तीन चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. नुकताच तो ब्रह्मास्त्र चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. पुढच्या वर्षी त्याचेपठाण’, ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे तिन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.