दरवर्षी भारतात शेकडो चित्रपटांची निर्मिती होते, यापैकी काही चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवतात; तर काही फ्लॉप होतात. काही सिनेमे तर तगडी स्टारकास्ट व शेकडो कोटींमध्ये बजेट असूनही प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरतात. असाच एक सिनेमा २०२४ मध्ये प्रदर्शित झाला, जो बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला.

यंदा ‘जिगरा’, ‘सरफिरा’, ‘मैदान’, ‘खेल खेल में’ असे अनेक बिग बजेट तगडी स्टारकास्ट असलेले सिनेमे फ्लॉप झाले. याच सिनेमांच्या यादीत बॉलीवूड कलाकारांची फौज असलेला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा समावेश आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा २०२४ मधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी ११ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
SAR Televenture takes over Tikona for Rs 669 crores print eco news
‘एसएआर टेलीव्हेंचर’चा ६६९ कोटींच्या मोबदल्यात ‘तिकोना’वर ताबा
Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray over the project Print politics news
मोठ्या प्रकल्पातील गतिरोधक दूर केले; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
savlyachi Janu Savali fame veena jagtap gift to megha dhade
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम वीणा जगतापने मेघा धाडेला दिवाळीनिमित्ताने दिलं खास गिफ्ट, व्हिडीओ होतोय व्हायरल
Actress Vidya Balan explanation of the movie Bhulbhulaiyaa 3
डझनावारी चित्रपटांतून नकाराचा अनुभव; ‘भुलभुलैया ३’ चित्रपटातील अभिनेत्री विद्या बालनचे स्पष्टीकरण
jahnavi killekar wash mother in law feet and perform pooja
Video : दिवाळीच्या दिवशी जान्हवी किल्लेकरने सासूबाईंसाठी केलं असं काही…; नेटकरी म्हणाले, “खरी लक्ष्मी तुच आहेस…”

हेही वाचा – फक्त १५ कोटींचे बजेट, कमावलेले ९०५ कोटी; चीनमध्ये सर्वाधिक कलेक्शन करणारा बॉलीवूड चित्रपट तुम्ही पाहिलाय का?

‘बडे मियाँ छोटे मियाँ’तील कलाकार

अक्षय कुमार व टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका असलेला अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी होती. या चित्रपटात अक्षय व टायगरसह, पृथ्वीराज सुकुमारन, मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, अलाया एफ व रोनित रॉय बोस, जुगल हंसराज हे कलाकार होते.

हेही वाचा – ९ वर्षांचा संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यावर गायिकेने मुंबईत घेतलं घर, फोटो केले शेअर

‘बडे मियाँ छोटे मियाँ’चे बजेट

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तब्बल ३५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती पूजा एंटरटेनमेंटने केली होती. ही दिग्गज निर्माते वाशू भगनानी व जॅकी भगनानी यांची निर्मिती कंपनी आहे. हा चित्रपट फ्लॉप झाल्याने पूजा एंटरटेनमेंटचे खूप मोठे नुकसान झाले.

हेही वाचा – ५३व्या मजल्यावरील आलिशान घरात राहते माधुरी दीक्षित, पाहा तिच्या मुंबईतील घरातील Inside Photos

‘बडे मियाँ छोटे मियाँ’चे कलेक्शन

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने भारतात फक्त ६५.९६ कोटी रुपये कमावले होते. जगभरात या सिनेमाने १११.४९ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट नंतर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता.