अभिनेता रितेश देशमुख बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांमध्ये गणला जातो. तो सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने रुपेरी पडद्यावर हटके भूमिका साकारत नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. इतकंच नव्हे तर विनोदी चित्रपटामध्ये काम करत रितेशने प्रेक्षकांना खळखळून हसायलाही लावलं. रितेश देशमुख आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खान हे एकमेकांचे फार चांगले मित्र आहेत. मात्र नुकतंच रितेश देशमुखने शाहरुख खानच्या पार्टीबद्दल विविध खुलासे केले आहे.

शाहरुख खान हा त्याच्या चित्रपटाप्रमाणे विविध पार्ट्यांसाठीही खास ओळखला जातो. त्याच्या मन्नत बंगल्यावर होणाऱ्या पार्ट्या या फारच चर्चेत असतात. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मन्नतवर होणारी प्रत्येक पार्टी ही अतिशय भव्य असतात. नुकतंच या पार्ट्यांबद्दल रितेश देशमुखने एक स्पष्ट उत्तर दिले. Unfiltered by Samdish या मुलाखतीदरम्यान रितेश देशमुखने शाहरुखच्या मन्नत बंगल्यावरील पार्टीबद्दल खुलासा केला.
आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…

यावेळी तो म्हणाला, मी आणि शाहरुख एकमेकांचे फार चांगले मित्र आहोत. हे बेबी या चित्रपटात मी प्रमुख भूमिका साकरत होती. त्यात शाहरुखने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. मन्नतमध्ये जेव्हा कधी पार्टीचे आयोजन झाले, त्यावेळी मी अनेकदा त्यांना उपस्थित लावली आहे. या पार्टीत सर्व काही फार छान असते.

विशेष म्हणजे यावेळीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे याचा होस्ट. जेव्हा कधी मन्नतमध्ये पार्टी होते तेव्हा शाहरुख स्वत: तुम्हाला गाडीपर्यंत सोडायला येतो. तुमच्यासाठी तो गाडीचा दरवाजा उघडतो आणि तुम्हाला निरोपही देतो. पण या पार्टीत मला एक गोष्ट फार खटकली आणि ती म्हणजे तिकडे असणारे जेवण. मन्नतमध्ये जेव्हा कधी गेट टू गेदर किंवा पार्टी असते तेव्हा रात्री उशिरा ३ वाजता जेवायला मिळते, असे रितेश म्हणाला.

आणखी वाचा : “मी तुमच्या गटाचा…” एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यानंतर अवधूत गुप्तेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान २०२३ मध्ये शाहरुख खानचे तीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. येत्या जानेवारी महिन्यात तो यशराज फ्लिम्सच्या ‘पठाण’ चित्रपटात झळकणार आहे. तर जूनमध्ये ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

Story img Loader