धर्मासाठी बॉलीवूड सोडणारी ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सना खानने ५ जानेवारीला दुसऱ्या मुलाला जन्म दिला. सनाचा मुलगा २२ दिवसांचा झाला आहे. आता सनाने त्याचे नाव जाहीर केले आणि फोटोमध्ये त्याची पहिली झलकदेखील दाखवली. सनाने एक सुंदर व्हिडीओ शेअर करून आपल्या लाडक्या मुलाचं नाव सांगितलं. तसेच चाहत्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करायला सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सना खानने आपल्या मुलाबरोबरचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा पती मुफ्ती अनस सय्यद त्यांचा मोठा मुलगा तारिक जमीलही दिसत आहेत. सना खानने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव सय्यद हसन जमील ठेवले आहे. आता तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती आकाशी रंगाचा ड्रेस घालून बसली आहे. आजूबाजूला पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या फुग्यांनी सजावट केली आहे. तसेच तिने हातात धाकटा लेक हसन जमीलला घेतलं आहे. सनाने त्याच्याबरोबरचे फोटो शेअर केले असले, तरी फोटोंमध्ये त्यांचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. पण त्याच्या जन्मानंतर त्याची ही पहिली झलक आहे.

पाहा पोस्ट

दुसऱ्या फोटोमध्ये सनाचा पती मुफ्ती अनसने मोठ्या मुलाला कडेवर घेतलं आहे, तर सना त्याची धाकट्या भावाशी ओळख करून देत आहेत. त्यांचा हा फॅमिली फोटो चांगलाच चर्चेत आहे. सना खानच्या या पोस्टवर चाहते व सेलिब्रिटी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

सना खानने चार वर्षांपूर्वी २०२० मध्ये सुरतमधील मुफ्ती अनस सय्यदशी लग्न केलं. या जोडप्याने लग्नानंतर तीन वर्षांनी पहिल्या बाळाचं स्वागत केलं. सना खानचा मोठा मुलगा दीड वर्षांचा आहे. जुलै २०२३ मध्ये तिने तिच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं होतं. आता तिला दुसरा मुलगा झाला.

सना खान ‘बिग बॉस ९’मध्ये दिसली होती. या शोमध्ये तिला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर सनाने मोठ्या पडद्यावर स्वतःचं नशीब आजमावलं. तिने काही चित्रपटांमध्ये काम केलं. दरम्यानच्या काळात तिचं लव्ह लाइफही बरंच चर्चेत होतं. पण २०२० मध्ये तिचं आयुष्य बदललं. तिने धर्मासाठी ग्लॅमर इंडस्ट्री सोडली. सिनेविश्व सोडले असले तरी ती सोशल मीडियावर मात्र खूप सक्रिय आहे. ती अनेक बॉलीवूड इव्हेंट्सला पतीबरोबर हेजरी लावत असते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former actress sana khan reveals name of her son shares first family photo mufti anas saiyad hrc