अनेक बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री सना खानने काही वर्षांपूर्वी अभिनयक्षेत्र सोडले. सनाने धर्मासाठी ग्लॅमर इंडस्ट्री सोडत असल्याचं म्हटलं होतं. सनाने चार वर्षांपूर्वी सुरतमधील मुफ्ती अनस सय्यदशी लग्न केलं. सनाचा आणि तिच्या पतीच्या वयात काही वर्षांचे अंतर आहे, असा खुलासा तिनेच केला आहे.

‘बिग बॉस’ फेम सना खानने रुबिना दिलैकच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने सांगितलं की तिचा पती तिच्यापेक्षा सात वर्षांनी लहान आहे. “एका मौलाना जींनी अनसच्या लग्नाचा प्रस्ताव मला पाठवला होता आणि मी म्हटलं की हे कसं शक्य आहे, कारण अनस माझ्यापेक्षा सात वर्षांनी लहान आहे,” असं सना म्हणाली.

आधी सनाला बहीण म्हणायचा पती, नंतर लग्नासाठी मौलवीशी मिळून बोलला खोटं; आता सांगितली लव्ह स्टोरी, म्हणाला, “तिने मला…”

अनसने लग्न करण्यासाठी समजूत घातल्याचं सनाने सांगिलं. “मौलाना मला खूप बोअर वाटायचे कारण मी ग्लॅमर इंडस्ट्रीत होते. पण एकदा मी अनसला त्याच्या दिवंगत मित्राच्या आत्म्यासाठी दुआ मागताना पाहिलं. मग मी स्वतःला विचारलं की माझा असा एकही मित्र आहे का, जो माझ्या मृत्यूनंतरही या गोष्टी करेल आणि मला समजलं की माझ्याकडे असा एकही मित्र नाही, याच गोष्टीमुळे मी अनसकडे आकर्षित झाले,” असं सना म्हणाली.

वाईन पिण्यासाठी स्वीकारला ख्रिश्चन धर्म, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा मोठा खुलासा; म्हणाली, “मी खूप…”

लोकाना वाटलं आमचं लग्न टिकणार नाही

सना म्हणाली, “आम्ही लग्न केलं तेव्हा लोकांना वाटलं की आमचं लग्न टिकणार नाही. तीन किंवा फारतर सहा महिन्यात आमचा घटस्फोट होईल, असं लोक म्हणत होते. लग्नाबद्दल वाईट कमेंट्स करत होते. मी कधीच आई होणं पसंत करणार नाही, असंही लोक म्हणत होते. लोक आमच्याबद्दल व्हिडीओ बनवायचे आणि अशा गोष्टी बोलायचे तेव्हा फार वाईट वाटायचं कारण मी खूप भावनिक व्यक्ती आहे आणि माझं नुकतंच लग्न झालं होतं. लग्नानंतरचे सुरुवातीचे सहा महिने मी सतत रडत असायचे. माझ्या पतीने मला समजावलं. लोकांना काय बोलायचं ते बोलूदे त्याचा आपल्याला फरक पडायला नको, असं तो मला म्हणत होता.”

Sana Khan says her husband Mufti Anas Sayed is 7 years younger to her love story
सना खान व तिचा पती मुफ्ती अनस सय्यद (फोटो – इन्स्टाग्राम)

“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

अनसला पहिल्यांदा भेटले तेव्हा…

“मी आयुष्यात खूप वाईट टप्प्यातून जात होते तेव्हा मी अनसला पहिल्यांदा भेटले होते. मी नैराश्यात होते. असं असूनही मी कधीच आत्महत्येचा विचार केला नाही, कारण इस्लाममध्ये आत्महत्या करणे हराम मानले जाते,” असं सनाने सांगितलं.

“माझा पती खूप साधा आहे, त्याचं आयुष्यही साधं होतं. मला आठवतंय आमचं लग्न झाल्यावर त्याच्याकडे फक्त सहा नवीन कपडे होते. जेव्हा मी त्याच्याशी लग्न केलं तेव्हा मी विचार करायचे याचे कपडे कुठे आहेत, कारण कपाटातील एका लहान कप्प्यात त्याचं सगळं सामान असायचं. लग्नानंतर आम्ही सोशल मीडियावर फोटो टाकायचो तेव्हा लोक विचारायचे, “तुझा पती नेहमी एकच ब्लेझर घालतो?” पण मला माहीत होतं की त्याच्याकडे दुसरे कपडे नाहीत. तो विकत घेऊ शकत होता, पण त्याला साधेपणाने जगायला आवडतं,” असं सना म्हणाली.