Sana Khan Welcomes Second Baby : धर्मासाठी बॉलीवूड सोडणारी ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सना खानने आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. सना खान दुसऱ्यांदा आई झाली आहे. सनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून बाळाच्या जन्माची गुड न्यूज दिली आहे. सना खानला दीड वर्षांचा मोठा मुलगा आहे. त्यानंतर आता तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सना खानने चार वर्षांपूर्वी २०२० मध्ये सुरतमधील मुफ्ती अनस सय्यदशी लग्न केलं. या जोडप्याने लग्नानंतर तीन वर्षांनी पहिल्या बाळाचं स्वागत केलं. त्यानंतर आता ते दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. सनाला दुसरा मुलगा झाला आहे. सनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने मुलाच्या जन्माबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा – अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”

पाहा पोस्ट –

सना खानचा मोठा मुलगा दीड वर्षांचा आहे. जुलै २०२३ मध्ये तिने तिच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं होतं. आता सना दुसऱ्यांदा आई झाली आहे. सनाने काही महिन्यांपूर्वी एक पोस्ट करून ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. आता सनाने तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. सनाला दुसरा मुलगा झाला आहे.

हेही वाचा – अभिनेत्री हंसिका मोटवानीसह तिच्या आई अन् भावाविरोधात वहिनीची पोलीस तक्रार, तीन वर्षांपूर्वी झालंय लग्न

सना खान ‘बिग बॉस ९’मध्ये दिसली होती. या शोमध्ये तिला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर सनाने मोठ्या पडद्यावर स्वतःचं नशीब आजमावलं. तिने काही चित्रपटांमध्ये काम केलं. दरम्यानच्या काळात तिचं लव्ह लाइफही बरंच चर्चेत होतं. पण २०२० मध्ये तिचं आयुष्य बदललं. तिने धर्मासाठी ग्लॅमर इंडस्ट्री सोडली. सिनेविश्व सोडले असले तरी ती सोशल मीडियावर मात्र खूप सक्रिय आहे. ती अनेक बॉलीवूड इव्हेंट्सला पतीबरोबर हेजरी लावत असते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former actress sana khan welcomes second baby with husband mufti anas sayed hrc