४ एप्रिल रोजी सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील ‘येंतम्मा’ हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यात तेलुगू आणि हिंदी भाषांचा वापर करण्यात आला आहे. सलमान खानच्या या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत. ही नवीन बातमी नाही. नुकतंच एका माजी क्रिकेटपटूने या गाण्याच्या बाबतीत पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.

भारताचा माजी फिरकी गोलंदाज लक्ष्मण शिवरामकृष्णन यांच्या मते हे अतिशय विद्रूप गाणे आहे आणि दक्षिण भारतीय संस्कृतीसाठी हे अपमानकारक आहे. ‘यंतम्मा’ या गाण्याबाबत लक्ष्मण यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, “हे अत्यंतविचित्र आणि हास्यास्पद आहे आणि आपल्या दक्षिण भारतीय संस्कृतीला तुच्छ लेखणारं आहे. ही लुंगी नाही, याला धोतर म्हणतात, आपल्या पारंपरिक पोषाखाची यात खिल्ली उडवण्यात आली आहे.”

chhaava film jane tu first song release starring vicky kaushal
हिंदवी स्वराज्य, महाराणी येसूबाईंची साथ अन्…; ‘छावा’चं पहिलं गाणं प्रदर्शित! ‘तो’ क्षण पाहून चाहते झाले भावुक, म्हणाले…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”
Uday Samant on chhava movie
Chhava Movie Controversy : अखेर छावा चित्रपटातला ‘तो’ वादग्रस्त भाग काढला; मंत्री उदय सामंत म्हणाले…
shahid kapoor at screen
Shahid Kapoor Live : ‘जब वी मेट’च्या गीत व आदित्यबद्दल शाहिद कपूरला काय वाटतं? पाहा मुलाखत
aishwarya and avinash narkar dances on tamil song
Video : ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा तामिळ गाण्यावर रोमँटिक अंदाज! नेटकरी म्हणाले, “एव्हरग्रीन जोडी…”

आणखी वाचा : ‘या’ सेलिब्रिटींनीसुद्धा केलेला अभिनयाचा प्रयत्न; यांचे चित्रपट पाहून प्रेक्षकही म्हणाले “उठा ले रे देवा”

गाण्यात सलमान खान आणि व्यंकटेश मुंडू परिधान करून नृत्य करताना दिसत आहे. मुंडू हा एक पारंपरिक पोशाख आहे जो सण आणि इतर शुभमुहूर्ताच्या दिवशी परिधान केलं जातं. तर लुंगी हे घरात परिधान केले जाणारे वस्त्र मानले जाते. या प्रकरणावर लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आणखीनही ट्वीट करत नेमकं लुंगी आणि धोतर यातला फरक समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे.

ऐंशीच्या दशकात लक्ष्मण यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. १९८३ मध्ये त्यांनी पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. त्यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना १९८६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. सलमानचे ‘येंतम्मा’ हे गाणे विशाल ददलानी आणि पायल देव यांनी गायले आहे. या गाण्यात सलमान आणि व्यंकटेशसह दाक्षिणात्य अभिनेता राम चरणही दिसत आहे. त्याने यात कॅमिओ केला आहे. सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader