अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडची देसी गर्ल ते ग्लोबल स्टार असा मोठा पल्ला गाठला आहे. २००० साली प्रियांकाने ‘मिस वर्ल्ड’चं विजेतेपद मिळवत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. पण आता जवळपास २२ वर्षांनंतर प्रियांका चोप्राच्या या विजेतेपदावर गंभीर आरोप केले जात आहेत. माजी मिस बार्बाडोस लीलानी मॅककॉने हिने प्रियांका चोप्राच्या विजेतेपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केलेत. प्रियांकाच्या विजेतेपदाचं आधीच फिक्सिंग झालं होतं असं तिचं म्हणणं आहे. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेत प्रियांकाला खास ट्रीटमेंट देण्यात आल्याचा आरोपही तिने केला होता.

प्रियांका चोप्राबरोबर मिस वर्ल्ड २००० मध्ये सहभागी झालेली लीलानी मॅककॉने आता एक युट्यूबर आहे. तिने जवळपास २२ वर्षांनंतर एका व्हिडीओच्या माध्यामातून धक्कादायक खुलासे केले आहेत. पण लीलानी आता एवढ्या वर्षांनंतर बोलण्याचं कारण काय? तर मिस युएसए ब्युटी पेजेंटमधील एका स्पर्धकाच्या विजेतेपदावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय आणि याचदरम्यान सौंदर्य स्पर्धांमध्येही फिक्सिंग होत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अशात आता लीलानीने मिस वर्ल्ड २००० स्पर्धेबाबत मौन सोडलं आहे.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Indian Women On Course For Clean Sweep Against West Indies
भारताचे निर्भेळ यशाचे लक्ष्य; वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज
Manu Bhaker breaks silence on Khel Ratna row
अर्ज भरण्यात माझ्याकडूनच चूक! खेलरत्न पुरस्कार वादावरून मनूचे स्पष्टीकरण
Smriti Mandhana World Record Most Runs in Calendar Year in Woman Cricket INDW vs WIW
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचा विश्वविक्रम, २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिली महिला फलंदाज
PAK vs SA 3rd ODI Baby Boy Birth in Medical Centre of Wanderers Stadium During Live Match
PAK vs SA: लाइव्ह सामन्यातच महिलेने स्टेडियममध्ये दिला मुलाला जन्म, आफ्रिका-पाकिस्तान वनडे सामन्यात नेमकं काय घडलं?
Allu Arjun rejects Telangana CM claim
महिलेच्या मृत्यूनंतरही अल्लू अर्जुन थिएटरमध्ये थांबला, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; अभिनेता म्हणाला, “मी इतका…”
fraud with woman doctor karad , karad ,
सातारा : सीमाशुल्क अधिकारी असल्याचे भासवून महिला डॉक्टरला गंडा

आणखी वाचा-दुसऱ्या महिलेबरोबर पतीला रंगेहाथ पकडल्यास काय करशील? प्रियांका चोप्रा म्हणाली…

लीलानी मॅककॉने हिने तिच्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, “जेव्हा प्रियांका चोप्राने मिस वर्ल्डचा मुकूट जिंकला होता त्यावेळी एक इंडियन चॅनेल या स्पर्धेला स्पॉन्सर करत होतं. आमच्या सॅशेवरही देशाच्या नावाआधी त्या चॅनेलच्या लोगो होता त्यानंतर देशाचं नाव लिहिण्यात आलं होतं.” प्रियांकाबद्दल ती म्हणाली, “ती एकमेव अशी स्पर्धक होती जिने बिकिनी राऊंडच्या वेळी सारोंग परिधान केला होता. तिला तशी परवानगी देण्यात आली होती. याचं कारण सांगण्यात आलेलं की, ती स्किनटोन ठीक करण्यासाठी कोणततरी क्रिम लावत होती पण त्याचा परिणाम दिसत नव्हता. त्यामुळे स्विमसूट राउंडमध्ये तिला सारोंग परिधान करायचा होता.”

priyanka chopra

लीलनी पुढे म्हणाली, “प्रियांका चोप्राला त्या स्पर्धेत सहभागी झालेल्यांपैकी कोणीच पसंत करत नव्हतं. प्रियांकाच्या तुलनेत व्यवस्थापकही इतर मुलींबरोबर भेदभाव करत होते. सर्व मुली एका ठिकाणी जेवत असत. तर प्रियांका चोप्राला मात्र तिचा नाश्ता बेडवर मिळत होता. जिंकण्याआधीच प्रियांका चोप्राचं बिचवर फोटोशूट करण्यात आलं होतं आणि त्यावेळी इतर मुलींना मात्र वाळूमध्ये समुद्र किनाऱ्यावर उभं करून ठेवण्यात आलं होतं.”

आणखी वाचा- “तिचं करण मेहराशी अफेअर…” सुश्मिता सेनच्या भावाचा पत्नीबाबत धक्कादायक खुलासा

याशिवाय लीलानीने प्रियांका चोप्राच्या आउटफिट्सबाबतही गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली, “ज्या डिझायनरने सर्व मुलीचे ड्रेस डिझाइन केले होते त्याने फक्त प्रियांकाच्या ड्रेसची फिटिंग व्यवस्थित ठेवली होती बाकी सर्व मुलींच्या ड्रेसची फिटिंग बिघडवण्यात आली होती.” लीलानीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यानंतर एकीकडे प्रियांका चोप्राच्या विजेतेपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे तर दुसरीकडे अनेकजण तिचं समर्थन करताना दिसत आहेत.

दरम्यान प्रियांका चोप्रा सध्या मुंबईत आहे. जवळपास ३ वर्षांनंतर ती मायदेशी परतली आहे. मात्र, ती एकटीच भारतात आली आहे. पती निक जोनास आणि मुलगी मालती तिच्याबरोबर आलेले नाहीत. आगामी काळात ती अनेक हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे फरहान अख्तरचा ‘जी ले जरा’ हा चित्रपट आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Story img Loader