कोविडदरम्यान दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आपली चांगलीच पकड घेतली. ‘केजीएफ २’ ‘पुष्पा’, ‘आरआरआर’पासून ‘कांतारा’पर्यंत कित्येक चित्रपट हिट ठरले. याचदरम्यान बॉलिवूड चित्रपटांकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली. ‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा ट्रेंड आमिर खानच्या चित्रपटापासून सुरू झाला तो काही केल्या थांबायचं नाव घेत नव्हता. अखेर यंदा शाहरुख खानच्या ‘पठाण’ने याला लगाम घातला अन् बॉलिवूड चित्रपटांनी पुन्हा उभारी घ्यायला सुरुवात केली.

२०२३ चा ऑगस्ट महिना तर हिंदी चित्रपट आणि खासकरून बॉलिवूडसाठी अगदीच खास ठरला. ऑगस्ट महिन्याचं बॉक्स ऑफिसवरील चित्र हे फार वेगळं असून, या महिन्यात तब्बल एक दोन नव्हे तर तब्बल ४ हिंदी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चारही चित्रपटांनी मिळून एका महिन्यात जबरदस्त कमाई केली आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: आईवरून मारला टोमणा आणि सूर्याने केली मारामारी; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सूर्या दादा आणि शत्रू यांच्यात राडा होणार
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
anupam kher kirron kher love story
घटस्फोटित अन् एका मुलाची आई असलेल्या किरण यांच्या प्रेमात पडले होते अनुपम खेर, ‘अशी’ झाली होती पहिली भेट
ratan tata simi garewal affair
एकेकाळी रतन टाटा होते ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात, पण होऊ शकलं नाही लग्न
singham again trailer
Singham Again : रामायणाशी खास कनेक्शन ते खलनायकाचा जबरदस्त अंदाज! ५ मिनिटांचा ट्रेलर पाहिलात का?
ranjeet shares memory of sunil dutt and nargis dutt
मुंबईत येऊन झालेले दोनच दिवस; ‘हे’ खलनायक थेट गेले सुनील दत्त यांच्या घरी, खुद्द नर्गिस यांनी वाढलं जेवण; अनुभव सांगत म्हणाले…
पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाड’चा जलवा! तीन आठवड्यात कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
Govinda wanted to marry neelam kothari
‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेला गोविंदा, रागात सुनीताशी मोडला होता साखरपुडा अन्…

आणखी वाचा : “मी चित्रपटाचं स्क्रिप्ट…” चित्रपटांच्या अपयशाबाबत नवाजुद्दिन सिद्दिकीने सोडले मौन

या चारही चित्रपटांनी एका महिन्यात एकूण ७५० कोटींची रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली आहे. करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाने १४८.७९ कोटींची कमाई केली तर सनी देओलच्या ‘गदर २’ने ४५६ कोटींचा गल्ला जमवला. अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ने १३२ कोटींची कमाई केली तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’ने आत्तापर्यंत ४० कोटींची कमाई केली आहे.

हे चारही हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही कमाई करत आहेत. यामध्ये रजनीकांत यांचा ‘जेलर’ प्रदर्शित झाला, त्यानेही उत्तम कमाई केली पण अजूनही बॉक्स ऑफिसवर या ४ चित्रपटांचा डंका वाजतोच आहे. यामुळे नेपोटीजम किंवा कंपूशाहीमुळे ‘बॉयकॉट बॉलिवूड’चा ट्रेंड चालवणाऱ्या लोकांना या चार हिंदी चित्रपटांनी त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमधून चोख उत्तर दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.