‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ फेम अभिनेत्री मानवी गाग्रू हिने जानेवारी महिन्यात साखरपुडा केला होता. त्यानंतर आता तिने तिच्या बॉयफ्रेंडबरोबर लग्न केलं आहे. मानवीने मोजके मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत वरुण कुमारशी लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली.

“आमच्या जवळच्या मित्रांच्या आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत, आज २४ फेब्रुवारी या पॅलिंड्रोम-इश तारखेला आम्ही आमचं नातं अधिकृत करतोय. तुम्ही आमच्या वैयक्तिक प्रवासात आम्हाला प्रेम आणि पाठिंबा दिला आहे, आता आमच्या एकत्र प्रवासात आम्हाला आशीर्वाद देत राहा,” असं मानवीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत म्हटलं आहे.

मानवीने लग्नात लाल रंगाची साडी नेसली होती, तर वरुणने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे. दोघांच्याही लग्नाच्या फोटोंवर बॉलिवूड सेलिब्रिटींसह त्यांचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Story img Loader