बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचे जगभरात लाखो चाहते आहेत. शाहरुखचा पठाण चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने १ हजार कोटीपेक्षाही अधिक कमाई केली आहे. शाहरुखने ४ वर्षांनंतर पठाणच्या माध्यमातून पुनरागमन केले आहे, आजपर्यंत कोणत्याही बॉलीवूड स्टारला अशी कामगिरी करता आलेली नाही.
अलीकडेच शाहरुख खानने आपल्या कुटुंबासह प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी यांच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’चा उद्घाटन सोहळ्यात हजेरी लावली होती. शाहरुख आणि अंबानी कुटुंबाचे जवळचे नाते आहे. अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात तो उपस्थित असतो. या कार्यक्रमात शाहरुखने एक जबरदस्त डान्सही केला होता.
हेही वाचा- “निक प्रियांकाला सोडून जाणार”; दोघांचे फोटो शेअर करत अभिनेत्याचा दावा, म्हणाला, “हा मुलगा…”
शाहरुख खानच्या चाहत्यांच्या यादीत भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनन यांचेही नाव आहे. इमॅन्युएल लेनेन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शाहरुख खानसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच कॅपशनमध्ये त्यांनी शाहरुखला परत फ्रान्समध्ये चित्रपटाचे शुटींग करण्याची विनंती केली आहे. इमॅन्युएल आणि शाहरुखच्या या फोटोला चाहते मोठ्या प्रमाणात लाईक करत कमेंट करताना दिसत आहेत.
पठाण स्टारसोबतचा फोटो शेअर करताना इमॅन्युएल ट्विट केले की, मुंबईत शाहरुख खानसोबतची त्यांची भेट खास होती. त्यांनी शाहरुख खानला फ्रान्समध्ये येऊन पुन्हा शूटिंग करण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की फ्रान्सचे लोक त्याच्यावर किती प्रेम करतात, त्यांना शाहरुखला आणखी पाहायचे आहे. २०१४ मध्ये शाहरुखला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार शाहरुख खानला फ्रान्सचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री लॉरेंट फॅबियस यांनी स्वतःच्या हाताने दिला होता.