मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित ‘फुकरे ३’ २८ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ८.५० कोटींची कमाई केली होती. कमाईमध्ये फुकरे ३ ने नाना पाटेकरांची मुख्य भूमिका असलेल्या ‘द व्हॅक्सिन वॉर’लाही मागे टाकले होते. मात्र, आता चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचे पहायला मिळत आहे. चित्रपटाच्या सहाव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- ‘स्वदेस’ फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘फुकरे ३’ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ८.५० कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७.७१ कोटींचा गल्ला जमवला. तर तिसऱ्या दिवशी (शनिवारी) या चित्रपटाने ११.३० कोटींचा व्यवसाय केला होता. आता या चित्रपटाच्या सहाव्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत. चित्रपटाने सहाव्या दिवशी केवळ ४.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर या चित्रपटाची एकूण कमाई ५९.५२ कोटी रुपये झाली आहे. या आठवडाभरात हा चित्रपट ८० कोटींची कमाई करु शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘फुकरे ३’ बरोबर नाना पाटेकरांची मुख्य भूमिका असलेला ‘द व्हॅक्सिन वॉर’ आणि कंगना राणौतचा ‘चंद्रमुखी २’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांची जादू फिकी पडल्याचे दिसून येत आहे. कमाईमध्ये फुकरे ३ ने या दोन्ही चित्रपटांना मागे टाकले आहे.

हेही वाचा- “शाहरुख-सलमानच्या नावाने रडत होता म्हणून घरी बसला”; प्रसिद्ध दिग्दर्शकाचा गोविंदावर मोठा आरोप; म्हणाले, “डेव्हिड धवनमुळे…”

फुकरे ३’ चित्रपटात पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंग, रिचा चढ्ढा आणि पंकज त्रिपाठी यांची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट ‘फुकरे’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. २०१३मध्ये याचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०१७ साली ‘फुकरे २’ हा सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘फुकरे ३’ चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा यांनी केलं आहे. यापूर्वीच्या दोन्ही भागांचेसुद्धा दिग्दर्शन त्यांनीच केले आहेत. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेन्मेटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.