‘गदर २’ चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात दमदार कमाई केली आहे. चित्रपटाच्या सातव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. अवघ्या सहा दिवसात २५० कोटींचा टप्पा गाठणाऱ्या ‘गदर २’ ने सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गदर २’ देशात ब्लॉकबस्टर पण परदेशात ठरला फ्लॉप, बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे निराशाजनक

सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर २’ त्याच्या रेकॉर्ड ब्रेकिंग कलेक्शनमुळे चांगलाच चर्चेत आहे. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाने देशभरातील चित्रपटगृहांमध्ये तुफान कमाई केली असून रिलीजच्या अवघ्या ६ दिवसांत २५० कोटींहून अधिक गल्ला जमवला. चित्रपटाने सातव्या दिवशी २३.२८ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाची एकूण कमाई आता २८४.६३ कोटींवर गेली आहे.

भारतात सात दिवसात ‘गदर २’ ने किती कमाई केली?


पहिल्या दिवशी – ४०.१ कोटी रुपये
दुसऱ्या दिवशी – ४३.०८ कोटी रुपये
तिसऱ्या दिवशी – ५० कोटी रुपये
चौथ्या दिवशी – ३८.७० कोटी रुपये
पाचव्या दिवशी – ५५.५० कोटी रुपये
सहाव्या दिवशी – ३३.५० कोटी रुपये
सातव्या दिवशी – २३.२८ कोटी रुपये

दरम्यान, हा बॉलीवूडमधील यंदाच्या मोजक्याच सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला आहे. या चित्रपटात सनी देओल, अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या ‘गदर २’ची संपूर्ण टीम चित्रपटाचं यश साजरं करत आहे.