सनी देओलच्या ‘गदर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. ५०० कोटींहून अधिक कमाई या चित्रपटाने केली. याच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाचे दिग्दर्शक अनिल शर्मा सध्या चांगलेच चर्चेत आहेत. अनिल शर्मा यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘गदर २’च्या घवघवीत यशानंतर अनिल शर्मा यांनी त्यांच्या आगामी ‘जर्नी’ या चित्रपटाची घोषणा केली आहे.

२२ वर्षांनी अनिल शर्मा यांनी सनी देओल व अमीषा पटेलला घेऊन बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हीट चित्रपट दिला अन् बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचला. प्रेक्षक आता अनिल शर्मा यांच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Navri Mile Hitlarla
Video: एजेची काळजी पाहून लीला झाली भावुक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
star pravah aboli serial new actress entry jahnavi killekar and mayuri wagh
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
Huppa Huiyya 2 announcement
ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा
jayam ravi changed his name
दाक्षिणात्य सुपरस्टारचा मोठा निर्णय! सिनेविश्वात २० वर्षे ज्या नावाने ओळख मिळाली, तेच बदलणार…; स्वतः घोषणा करत म्हणाला…

आणखी वाचा : ‘द लेडी किलर’ चित्रपट अर्धवटच, दिग्दर्शक अजय बेहल यांनी दिली कबुली; म्हणाले, “हा चित्रपट विस्कळीत…”

मंगळवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून त्यांच्या आगामी ‘जर्नी’ या चित्रपटाची घोषणा केली. अनिल शर्मा यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, “गदर २ च्या यशानंतर बाबा काशी विश्वनाथ यांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या पुढील ‘जर्नी’ची सुरुवात केली आहे.” हे ट्वीट करताना अनिल शर्मा यांनी काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेते नाना पाटेकर व उत्कर्ष शर्मा दिसत आहेत.

anil-sharma-new-film
फोटो : सोशल मीडिया

या चित्रपटात नाना पाटेकर हे प्रमुख भूमिकेत आहेत. इतर कलाकारांबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. २२ वर्षांनी अनिल शर्मा यांनी ‘गदर २’च्या माध्यमातून जबरदस्त हीट चित्रपट दिला. याआधी त्यांनी ‘गदर एक प्रेम कथा’, ‘जिनियस’, व सलमान खानच्या ‘वीर’चं दिग्दर्शन केलं आहे. आता त्यांच्या या आगामी ‘जर्नी’ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.

Story img Loader