अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा पार केला. या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या शुक्रवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे २० कोटींची कमाई केली. सनी देओलचा ‘गदर २’ ११ ऑगस्ट रोजी अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ला टक्कर देत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. पण तरी ‘गदर २’ इतर चित्रपटाला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केवळ १८ दिवसांत ‘गदर २’ या चित्रपटाने ४६२ कोटींची कमाई केली आहे. वेगवेगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडीत काढले आहेत. शाहरुख खानच्या ‘पठाण’चेही काही रेकॉर्ड ‘गदर २’ने मोडीत काढले आहेत. असाच एक आगळा वेगळा रेकॉर्ड या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केला आहे. याचं कनेक्शन थेट हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग यांच्याशी आहे.

आणखी वाचा : ‘गदर’साठी सनी देओल नव्हे तर गोविंदा होता दिग्दर्शकाची पसंती? अनिल शर्मा यांनी सांगितलं नेमकं सत्य

तब्बल ४० वर्षांनी सुपरहीट चित्रपट देणारे अनिल शर्मा हे या भारतातील नव्हे तर जगातील दुसरे दिग्दर्शक आहेत. त्यांच्याआधी हा रेकॉर्ड स्टीवन सपीलबर्ग यांच्या नावावर होता. १९७५ मध्ये स्पीलबर्ग यांनी ‘jaws’ हा सुपरहीट चित्रपट दिला. त्यानंतर त्यांनी बरेच चित्रपट दिले, पण ४० वर्षांनी त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘रेडी प्लेयर वन’ हा चित्रपटही चांगलाच गाजला.

अनिल शर्मा यांनीही १९८१ साली ‘श्रद्धांजली’ हा चित्रपट दिग्दर्शित केला जो बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. त्यानंतर आता पुन्हा ४० वर्षांनी २०२३ मध्ये ‘गदर २’च्या माध्यमातून अनिल शर्मा यांनी पुन्हा इतिहास रचला आहे. त्यामुळे ४० वर्षांचा मोठा काळ ओलांडून आजच्या काळातही सुपरहीट चित्रपट देणारे सध्या दोनच दिग्दर्शक आहेत. पहिले म्हणजे स्टीवन स्पीलबर्ग आणि दुसरे आपले अनिल शर्मा.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadar 2 director anil sharma created this new record after steven speilberg avn
Show comments