अभिनेत्री अमीषा पटेल ‘गदर २’ चित्रपटामुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. ‘गदर २’ च्या निमित्ताने २२ वर्षांपूर्वी सुपरहिट ठरलेल्या ‘गदर : एक प्रेमकथा’च्या तारा-सकिनाची जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाली. दोन्ही चित्रपटांमध्ये तारा सिंगची भूमिका अभिनेता सनी देओल, तर सकिनाची भूमिका अभिनेत्री अमीषा पटेलने साकारली आहे. ‘गदर २’ रिलीज होण्यापूर्वी अमीषाने दिग्दर्शक अनिल शर्मा आणि त्यांच्या प्रोडक्शन हाऊसवर ट्विटरच्या माध्यमातून गंभीर आरोप केले होते. याबाबत आता स्वत: अनिल शर्मांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा : बिग बॉस गाजवणाऱ्या ‘या’ लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? लवकरच अडकणार आहे विवाहबंधनात

Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
kumar vishwas
कुमार विश्वास यांनी सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय विवाहावर केली टिप्पणी; काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या…
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Image Of Rahul And Priyanka Gandhi.
Priyanka Gandhi : “मी त्यांची बहीण, असे कृत्य…”, राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; प्रियांका गांधी यांची पहिली प्रतिक्रीया
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधी मागणीवर ठाम, “अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे, त्यांनी राजीनामा…”

‘गदर’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा म्हणाले, “माझं कधीच कोणाशी भांडण होत नाही, जरी झालं तरी मोठ्या प्रमाणात होत नाही. अमीषाचं व्यक्तिमत्त्व पहिल्यापासून असंच आहे. यापूर्वी ‘गदर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुद्धा तिच्या स्वभावामुळे आमच्यात मतभेद झाले होते आणि आताही झाले. अमीषा मोठ्या घरची मुलगी असल्याने तिच्यात अहंकार आहे आणि तिचे खूप नखरे असतात. यामुळेच तिचे अनेकांशी मतभेद होतात. पण, तिच्या मनात काहीच नसतं. ती फक्त गोष्टी बोलून जाते, माणूस म्हणून फार चांगली आहे.”

हेही वाचा : “मी सई ताम्हणकरची मैत्रीण होण्याचा प्रयत्न केला, पण…” अमृता खानविलकर स्पष्टच बोलली

अनिल शर्मा पुढे म्हणाले, पहिल्या गदरसाठी जेव्हा अमीषाची निवड करण्यात आली, तेव्हा तिला अभिनय करता येत नव्हता हे मी मान्य करतो. पण, लूकनुसार ती या भूमिकेसाठी योग्य होती. आमच्या टीमच्या सल्ल्यानुसार अमीषाने ६ महिने प्रशिक्षण घेण्यास तयार होती. त्यानंतर दिवसातील ४ ते ५ तास देऊन तिने या भूमिकासाठी खूप मेहनत घेतली.

हेही वाचा : प्रेमाची जाहीर कबुली दिल्यावर मीरा जोशीने सांगितली लग्नाची तारीख! कोण आहे अभिनेत्रीचा होणारा नवरा?

दरम्यान, २००१ मध्ये रिलीज झालेला ‘गदर : एक प्रेमकथा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ ने सुद्धा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. ‘गदर २’ ने जगभरात ६०० कोटींचा गल्ला जमावला आहे.

Story img Loader