‘गदर २’ हा चित्रपट यावर्षीच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. २ दशकापूर्वीच्या सुपरहिट ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आता या चित्रपटाबाबत दिग्दर्शकाने मोठं विधान केलं आहे.
गेल्या अनेक दिवस या चित्रपटाची टीम या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा तसा त्या एका मुलाखतीत या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी या चित्रपटाचा आणि रामायण-महाभारताचं कनेक्शन आहे असं म्हटलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना “‘गदर २’मध्ये सनी देओलने अभिमन्यू चक्रासारख्या जड वाहनाचं चाक उचललं आहे. तर उत्कर्ष आणि तो रणांगणात महाभारताप्रमाणे लढताना दिसत आहेत. हा चित्रपट महाभारतापासून प्रेरित आहे का?” असं विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, “हो. हे अगदी खरं आहे. ‘गदर’चा पहिला भागही रामायणापासून प्रेरित होता. प्रभू राम सीता मातेला वाचवायला जातात. तसंच ‘गदर’मध्ये तारा सिंग सकीनाला वाचवण्यासाठी जातो.”
हेही वाचा : Gadar 2 teaser: जबरदस्त डायलॉग, सनी देओलची खास झलक; ‘गदर २’चा टीझर प्रदर्शित, पण…
दरम्यान, ‘गदर २’ या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.