ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेमकथा’ या चित्रपटाचा सीक्वेल तब्बल २२ वर्षांनी ‘गदर २’च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘गदर’ प्रदर्शित झाल्यावर अनेकांनी “मुस्लीमविरोधी” म्हणून या चित्रपटावर टीका केली होती. याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुनसह सायली फोडणार हंडी, जुई गडकरीने शेअर केला शूटिंगचा खास व्हिडीओ
‘गदर’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधताना म्हणाले, “मला दोन्ही ‘गदर’ चित्रपट करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. आमचा चित्रपट प्रेक्षकांना जास्त कनेक्ट होतो. आमच्या चित्रपटात मुस्लीमविरोधी असं काही नाही. चित्रपट न बघताच काही लोक अशा कमेंट्स करतात. अशा सगळ्या लोकांना मी पुन्हा एकदा चित्रपट पाहण्यास सांगेन. हा चित्रपट मुस्लीमविरोधी किंवा पाकिस्तानविरोधी नाही. हा एक मानवी चित्रपट आहे, प्रेक्षकांनी गीता आणि कुराण या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे का स्वीकारू नये? चित्रपटातून एकतेचा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.”
हेही वाचा : “लता दीदी आणि आशाताई यातलं कोण ग्रेट?” विजू मानेंनी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
“‘गदर २’मध्ये आम्ही अभिनेत्री सिमरत कौरचे कुटुंब चांगले दाखवले आहे. आम्ही कोणाच्याही आणि कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, मुस्लीम समुदाय आमचा सर्वात मोठा प्रेक्षकवर्ग आहे आणि ते आम्हाला खूप प्रिय आहेत. मला माझ्या सिनेमावर प्रचंड विश्वास आहे.” असं स्पष्ट उत्तर अनिल शर्मांनी ‘गदर’ चित्रपटावर टीका करणाऱ्यांना दिलं आहे.
हेही वाचा : “शाहरुख खानने…”, ‘जवान’ चित्रपट पाहिल्यानंतर मयुरी देशमुखची प्रतिक्रिया चर्चेत
दरम्यान, ‘गदर २’मध्ये सनी देओल, अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाने आतापर्यंत एकूण ५०८.९७ कोटींची कमाई केली आहे.