२००१ मध्ये रिलीज झालेल्या ‘गदर : एक प्रेमकथा’ या चित्रपटाचा सीक्वेल ‘गदर २’च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला. सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या ‘गदर २’ला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानंतर सनी देओल अलीकडेच रणवीर अल्लाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. यावेळी अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्यासह बॉलीवूडमधील अनेक गोष्टींविषयी भाष्य केलं.
हेही वाचा : “मुलाला हात लावण्याआधी…”, ‘जवान’मधील शाहरुख खानचा ‘तो’ डायलॉग ऐकून नेटकऱ्यांना आठवले समीर वानखेडे; म्हणाले…
तब्बल २२ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘गदर : एक प्रेमकथा’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. परंतु, अलीकडेच ब्रिटीश पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत ‘गदर’नंतर चित्रपटाच्या ऑफर्स आल्या नाहीत असं सनी देओलने म्हटलं होतं. याविषयी अभिनेत्याला या पॉडकास्टमध्ये प्रश्न विचारण्यात आला. यावर सनी देओल म्हणाला, “हो… हे अगदी खरंय, गदरनंतर मला अपेक्षित काम मिळालं नाही. चित्रपटाच्या ऑफर्स आल्या नाहीत आणि या गोष्टी का झाल्या याची मला आजही कल्पना नाही.”
हेही वाचा : “माझ्या वाढदिवसाला येशील का?”, चाहत्याला उत्तर देत सई ताम्हणकरने ठेवल्या ‘या’ अटी; म्हणाली, “वरण-भात…”
सनी देओल पुढे म्हणाला, “या सगळ्या गोष्टींवर मी विचार करण्यास सुरूवात केली. आधी आपला हिंदी सिनेमा होता…कालांतराने मनोरंजनसृष्टीत अनेक बदल झाले. आपल्या हिंदी सिनेमाला बॉलीवूड म्हटलं जातं हे मला अजिबात आवडत नाही. बाहेर हॉलीवूड आहे म्हणून आपण बॉलीवूड म्हणणं गरजेचं नाही…यामध्ये अभिमान वाटण्यासारखं काहीच नाही.”
हेही वाचा : “तुमचा लेखक कुठे आहे?” ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’चा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक संतप्त; म्हणाले…
“आजही इंडस्ट्रीमधील अनेक लोक आनंदाने ‘वी आर बॉलीवूड’ वगैरे असं बोलतात…आपण सर्वप्रथम भारतीय आहोत, हिंदी सिनेमा म्हणा… आपण जे आहोत त्याचा अभिमान बाळगणं गरजेचं आहे. हिंदी सिनेमाकडे प्रत्येक गोष्ट आहे त्यामुळे आपल्याला इतरांची नक्कल करण्याची काहीच आवश्यकता नाही. आधीच्या काळात एका कुटुंबासारखा चित्रपट बनवला जायचा. पण, अलीकडे खरंच गोष्टी बदलल्या आहेत. इंडस्ट्रीमध्ये आपण विविध भूमिका साकारण्यासाठी आणि अभिनय करण्यासाठी आलो आहोत. डान्स, बॉडी बिल्डींग करण्यासाठी नाही.” असं स्पष्ट मत बॉलीवूडबाबत अभिनेता सनी देओलने मांडलं.