बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेल सध्या ‘गदर २’मुळे चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेत्रीला तिच्या करिअरमध्ये आमिर खान, सलमान खान, संजय दत्त, सनी देओल अशा बड्या स्टार्ससह काम करण्याची संधी मिळाली. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अमीषाने या अभिनेत्यांसह काम करण्याचा अनुभव कसा होता याविषयी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “आडनाव बदलायचा प्रश्नच नाही”, जेव्हा गौतमी पाटीलच्या वडिलांनी टीका करणाऱ्यांना दिलं होतं सडेतोड उत्तर

अमीषा पटेल अनुभव सांगत म्हणाली, आमिर अत्यंत प्रोफेशनल, वक्तशीर आणि भूमिकेचा सखोल अभ्यास करून काम करणारा अभिनेता आहे. तसेच सलमान खान अतिशय खोडकर आणि माझा खूप चांगला मित्र आहे. त्यांच्या मैत्रीला अमीषाने ‘नॉटी बॉय बेस्ट फ्रेंड’ असं नाव दिलं.

हेही वाचा : अभिनेत्री मीरा जोशी झळकणार ‘या’ लोकप्रिय मालिकेत; शरद पोंक्षेंबरोबर करणार काम

संजय दत्तबद्दल अमीषा म्हणाली, “गेल्या २० वर्षांपासून संजय दत्त माझं लग्न जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. तो नेहमी मला म्हणतो, अमीषा तू या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी खूप भोळी आहेस. चल…तुझं मी लग्न लावून देतो. गेल्या २० वर्षांपासून तो माझ्यासाठी जोडीदार (परफेक्ट मॅच) शोधत आहे. तुझ्या लग्नात कन्यादान मी करणार असं संजूने मला सांगून ठेवलं आहे. माझं लग्न झाल्यावर त्याला खूप आनंद होईल.”

हेही वाचा : अनन्याबरोबर ब्रेक-अपनंतर ईशान खट्टरला मिळाली त्याची ‘ड्रीम गर्ल’; जाणून घ्या कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?

दरम्यान, अमीषाने आमिर खानबरोबर ‘मंगल पांडे: द रायझिंग’ (२००५) या चित्रपटात, तर ‘ये है जलवा’ (२००२) मध्ये सलमान खानबरोबर काम केलं आहे. संजय दत्तच्या ‘तथास्तु’ आणि ‘चतुर सिंग टू स्टार’ या चित्रपटांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सध्या अमीषा प्रमुख भूमिकेत असलेला ‘गदर २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadar 2 fame ameesha patel reveals sanjay dutt has been trying to get her married for last 20 years sva 00