सनी देओल व अमीषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. तब्बल २२ वर्षांनी ‘गदर एक प्रेम कथा’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. चित्रपटाचे कलाकार सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशातच भारतीय लष्कराला हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. ८ ऑगस्ट रोजी भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांसाठी चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“शैलेश लोढांचा दावा खोटा,” एक कोटींचा खटला जिंकण्याबद्दल असित मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “न्यायालयाच्या आदेशात…”

आपल्या भारतीय लष्कराने सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या ‘गदर २’ चा पहिला रिव्ह्यू दिला आहे. ‘बॉलिवुड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, चित्रपट पाहून अधिकाऱ्यांचे डोळे पाणावले होते. सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. हा चित्रपट पहिल्यापेक्षा जास्त आवडल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, “चित्रपटाच्या पहिल्या स्क्रिनिंगला अधिकाऱ्यांकडून त्यांच्याकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आणि गदर: एक प्रेम कथा पेक्षाही हा चित्रपट त्यांना चांगला वाटला. स्क्रिनिंगमधून बाहेर पडताना त्यांनी ‘हिंदुस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिला. त्यांचा प्रतिसाद अतिशय उत्साही आणि सकारात्मक होता.”

समीर वानखेडेंनी सांगितली जुळ्या मुलींची नावं आणि नावामागची गोष्ट; म्हणाले, “आत्याला कॅन्सर झाला होता अन्…”

दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ट्वीटच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं होतं,”भारतीय लष्कराच्या उच्च अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह ८ ऑगस्टला रात्री दिल्लीतील चाणक्य पीव्हीआर येथे विशेष स्क्रीनिंग दरम्यान ‘गदर ‘२ चा पहिला प्रिव्ह्यू पाहिला. चित्रपटाची संपूर्ण टीम त्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांमुळे भारावून गेली आहे. ‘गदर एक प्रेम कथा’चा वारसा त्याच्या दुसऱ्या भागासह पुढे जात आहे. देवाचा आशीर्वाद आहे. आम्ही ११ ऑगस्ट रोजी तुमचा अनुभव पाहू.”

दरम्यान, ११ ऑगस्ट रोजी ‘गदर २’ आणि अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड २’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. दोन्ही चित्रपट सिक्वेल आहेत. गदर २मध्ये सनी देओल, अमीषा पटेल उत्कर्ष शर्मांच्या मुख्य भूमिका आहेत. तर, ‘ओह माय गॉड २’मध्ये अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, यामी गौतम यांच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadar 2 first review by indian army soldiers sunny deol ameesha patel film hrc