सनी देओल व अमीषा पटेल यांचा ‘गदर २’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल २२ वर्षांनी प्रेक्षकांना चित्रपटाचा सिक्वेल पाहायला मिळणार आहे. अशातच चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याला अवघ्या दोन तासांत जवळपास दीड मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

SatyaPrem Ki Katha Review: कसा आहे कार्तिक-कियाराचा ‘सत्यप्रेम की कथा’? चित्रपट पाहिल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले…

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Puneri kaka dance video uncle aunty dance video goes viral on social media
VIDEO: पुणेकर काकांचा नाद नाय! चंद्रा गाण्यावर केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणतात “आयुष्य असं जगता आलं पाहिजे”
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
ajay devgan and aamir khan
‘इश्क’च्या शूटिंगवेळी चिपांझीने केलेला हल्ला; ‘वाचवा, वाचवा’ म्हणत आमिर खान ओरडला अन् अजय देवगणने धावत्या कारमधून…

निर्मात्यांनी ‘उड़ जा काले कावा’ या ‘गदर एक प्रेम कथा’मधील गाण्याचंच नवीन व्हर्जन तयार केलंय. यामध्ये तारा सिंग व सकिनाचं वाढलेलं वय दिसतंय. तसेच गाण्याचे बोलही बदलण्यात आले आहेत. मूळ गाणं तर सुपरहिट होतंच, पण हे नवीन व्हर्जनही प्रेक्षकांना भावलं आहे. गाण्याला दोन तासांच्या आत १३ लाख लोकांनी पाहिलं आहे.

नेटकरी या गाण्यावर कमेंट्सही करत आहेत. आधीच्या गाण्याप्रमाणेच हे गाणंही उदित नारायण यांनी गायलंय, त्यामुळे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. त्यांनी दिग्दर्शकाचे आभारही मानले आहेत.

comments 1
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

“एखादं जुनं गाणं कसं रिक्रिएट करावं, हे मिथूनकडून शिकावं”, असं एका युजरने म्हटलं आहे.

comments
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, ‘गदर’ व आता येऊ घातलेला सिक्वेल या दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे. ‘गदर २’ ११ ऑगस्ट या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.