सनी देओल व अमीषा पटेल यांचा ‘गदर २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सहा दिवसात २५० कोटींहून जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतंय. चित्रपट रोज नवनवीन बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडत आहे. अशातच हा चित्रपट भारतात जेवढा चालतोय, त्या तुलनेने परदेशात त्याची क्रेझ नाही. बॉक्स ऑपिस कलेक्शनच्या आकडेवारीवरून ‘गदर २’ परदेशात फ्लॉप झाल्याचं दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतात सहा दिवसात ‘गदर २’ ने किती कमाई केली?

पहिल्या दिवशी – ४०.१ कोटी रुपये
दुसऱ्या दिवशी – ४३.०८ कोटी रुपये
तिसऱ्या दिवशी – ५० कोटी रुपये
चौथ्या दिवशी – ३८.७० कोटी रुपये
पाचव्या दिवशी – ५५.५० कोटी रुपये
सहाव्या दिवशी – ३३.५० कोटी रुपये

‘गदर २’ ची परदेशात निराशाजनक कामगिरी

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा एखादा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट होतो तेव्हा तो देशातच नाही तर परदेशातही चांगली कमाई करतो. पण ‘गदर २’ बद्दल बोलायचं झाल्यास एकीकडे हा चित्रपट भारतात खूप मोठा ब्लॉकबस्टर ठरला, तर दुसरीकडे तो परदेशी प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला. चित्रपटाने वीकेंडला २.१६८ मिलियन अमेरिकन डॉलर्सची कमाई केली. म्हणजे या चित्रपटाने १७.९९ कोटी रुपये कमावले. चित्रपट सहजासहजी ५ मिलियन अमेरिकन डॉलर्सची कमाई करू शकेल अशी चिन्हे नाहीत.

‘गदर २’ ची परदेशातील कमाई किती?

अमेरिका: १,२१३,१९० डॉलर
ऑस्ट्रेलिया: ३, १७, ८९, ०३८ डॉलर्स
जर्मनी: ३९, ५४६ युरो
मलेशिया: ११,५२३ डॉलर्स
न्यूझीलंड: १३३, ६८५ डॉलर्स

आकडेवारी पाहिल्यास ‘गदर २’ परदेशी प्रेक्षकांनी मनं जिंकण्यास अपयशी ठरल्याचं दिसून येतं. भारतात ब्लॉकबस्टर ठरलेला हा चित्रपट परदेशात मात्र चांगली कामगिरी करू शकलेला नाही. येत्या काही दिवसात आकडेवारीत थोडी वाढ होईल, पण ती भारताच्या तुलनेत फारच कमी असेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadar 2 flop in foreign checkout worldwide box office collection hrc