करोनानंतरच्या काळात चित्रपट फ्लॉप होण्याचा जणू ट्रेंडच आला होता, मागच्या तीन वर्षांत अगदी मोजकेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले होते, पण त्या तुलनेत यंदाचा ऑगस्ट महिना बॉलीवूडसाठी खूप खास राहिला. या महिन्यात आलेले चित्रपट हिट तर झालेच पण त्यांनी दमदार कमाईही केली. फक्त ऑगस्टमध्ये बॉलीवूड चित्रपटांनी १२०० हून जास्त कोटींची कमाई केली आहे.

नाना पाटेकरांनी अवघ्या ७५० रुपयांत केलेलं लग्न, बँकेत होत्या त्यांच्या पत्नी; असं काय झालं की वेगळे राहतात दोघं, जाणून घ्या

allu arjun pushpa 2 trailer release
Pushpa 2 : “श्रीवल्ली मेरी बायको…”, जबरदस्त डायलॉग अन् अल्लू अर्जुनचा हटके अंदाज; ‘पुष्पा २’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
subhash ghai reveals success secret
कलाकृतीत भारतीयत्व असेल तर ती दीर्घकाळ यशस्वी ठरते, दिग्दर्शक सुभाष घई यांनी उलगडले त्यांच्या यशामागचे इंगित
raveena tandon 8 movies hit in a year
‘या’ अभिनेत्रीने एकेकाळी सेटवर साफ केला कचरा, पहिलाच सिनेमा झाला फ्लॉप; नंतर एकाच वर्षात दिले आठ सुपरहिट सिनेमे
Stree 2 box office collection
‘स्त्री २’ नव्हे तर ‘हा’ आहे २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट; जगभरात कमावले तब्बल…
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar reached in Nepal for movie shooting
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरचा येणार नवा चित्रपट, चित्रीकरणासाठी पोहोचला ‘या’ देशात
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध

ऑगस्टमध्ये सनी देओल व अमीषा पटेलचा ‘गदर २’, अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ आणि आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’ प्रदर्शित झाला. सिक्वेल असलेल्या या तिन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळाली. ‘गदर २’ हा ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांपैकी आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट आहे. ‘गदर २’ ने इतर चित्रपटांपेक्षा कितीतरी पटीने जास्त कमाई केली आहे. या यादीत पुढे ‘OMG 2’ चे नाव आहे, ज्यात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

Video: “हिंदू धर्मात काय वाईट होतं की तू इस्लाम स्वीकारला”? प्रश्न ऐकताच राखी सावंत गोंधळली; क्षणभर विचार केला अन्…

‘ई-टाइम्स’च्या रिपोर्टनुसार, ‘गदर २’ ने जगभरात ६३१.८ कोटी रुपयांची कमाई करून बॉलीवूड उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तर ओएमजीने जगभरात ३३६.१ कोटींचा व्यवसाय केला आहे. करण जोहरचा चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ २९ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता, या चित्रपटाने ऑगस्टमध्ये जबरदस्त व्यवसाय केला आणि ३३६.१ कोटी रुपयांची कमाई केली.

हेही वाचा – राहत्या घरात मृतावस्थेत आढळली प्रसिद्ध अभिनेत्री

आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’ देखील २५ ऑगस्ट रोजी रिलीज झाला आणि ७ दिवसांतच या चित्रपटाने जगभरात ८९.१ कोटींचा व्यवसाय केला. अशा प्रकारे ऑगस्टमध्ये बॉलीवूडने एकूण १२६० कोटींचा व्यवसाय केला. एकूणच या चित्रपटांच्या कमाईची आकडेवारी पाहता बॉलीवूडसाठी ऑगस्ट महिना खास राहिला असं म्हणता येईल.