सनी देओल व अमीषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. तब्बल २२ वर्षांनी ‘गदर एक प्रेम कथा’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. तर आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी धमाकेदार ऑफर आणली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गदर २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील ॲक्शन, या चित्रपटातील कलाकारांची कामं हे सर्वच प्रेक्षकांना आवडलं आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाऊसफुल होत आहेत. आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने निर्मात्यांनी प्रेक्षकांना खास ऑफर दिली आहे.

आणखी वाचा : पुन्हा एकदा तारा सिंगची भूमिका साकारण्यासाठी सनी देओलने आकारले ‘इतके’ मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क

इतके दिवस चांगला चाललेला चित्रपट रक्षाबंधनाच्या दिवशी ही चांगली कामगिरी करेल असा विश्वास निर्मात्यांना आहे. त्यामुळे कमाई आणखीन वाढवण्यासाठी निर्मात्यांनी आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने दोन तिकिटांवर दोन तिकिटं मोफत ही जबरदस्त ऑफर प्रेक्षकांना दिली आहे. याचा अर्थ आजच्या दिवशी या चित्रपटाचे जे शो होतील त्या शोच्या दोन तिकिटांवर दोन तिकीटं फ्री देण्यात येणार आहेत.

हेही वाचा : “‘गदर २’ आणि ‘पठाण’ सुपरहिट झाले कारण…”, हेमा मालिनींनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या…

दरम्यान ‘गदर २’ या चित्रपटाने शाहरुख खानच्या पठाणलाही मागे टाकलं आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ४५० कोटींचा गल्ला जमवला आहे. अजूनही या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadar 2 producers are giving 2 free tickets on 2 bookings know about it rnv
Show comments