केवळ १८ दिवसांत सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या ‘गदर २’ या चित्रपटाने ४६२ कोटींची कमाई केली आहे. वेगवेगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडीत काढले आहेत सनी देओलचा ‘गदर २’ ११ ऑगस्ट रोजी अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ला टक्कर देत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. पण तरी ‘गदर २’ इतर चित्रपटाला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सनी देओल या चित्रपटाचं यश साजरं करण्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखती देत आहे. नुकतंच त्याने यूट्यूबर रणवीर अल्लाहबादिया याच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये सनीने बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला. खासकरून आपल्या बालपणाबद्दल सनी देओल मोकळेपणाने बोलला. ‘तारे जमीन पर’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेला ‘डिस्लेक्सिया’ हा आजारही सनीला लहानपणी होता असं त्याने कबूल केलं.

आणखी वाचा : ‘गदर २’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या नावे झाला ‘हा’ नवा रेकॉर्ड; स्टीवन स्पीलबर्गशी आहे खास कनेक्शन

सनी देओल म्हणाला, “मला लहानपणी डिस्लेक्सिया हा आजार होता. त्या काळात या आजारांना अशी नावं असतात ही कल्पनाही आम्हाला नव्हती. माझं अभ्यासात लक्ष नसल्याने सगळेच मला मूर्खात काढायचे, काही जण तर मला थोबडावून काढायचे. वाचण्यातही मला प्रचंड त्रास व्हायचा. आधी चारचौघात बोलायचीही मला लाज वाटायची, पण कालांतराने मी यावर मात केली.”

‘गदर २’ हा २००१ साली आलेल्या ‘गदर एक प्रेम कथा या चित्रपटाचा सीक्वल आहे. २००१ प्रमाणेच या दुसऱ्या भागानेही प्रेक्षकांना वेड लावलं आहे. लवकरच ‘गदर २’ हा चित्रपट ५०० कोटींचा टप्पा पार करून शाहरुख खानच्या ‘पठाण’लाही मागे टाकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadar 2 star sunny deol says he was dyslexic as a child in interview avn
Show comments