११ ऑगस्ट रोजी ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले. सनी देओल व अमीषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘गदर २’ की अक्षय कुमार व पंकज त्रिपाठींच्या मुख्य भूमिका असलेला ‘ओएमजी २’ यापैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे पाहिल्यास ‘गदर २’ वरचढ ठरला, त्या तुलनेने ‘ओएमजी २’ ने खूप कमी कमाई केली. आता दोन्ही चित्रपटांच्या दुसऱ्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसऱ्यांदा गरोदर होती रानी मुखर्जी, पण गमावलं बाळ; खुलासा करत म्हणाली, “मी पहिल्यांदाच माझ्या…”

‘गदर २’ चे दुसऱ्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन


सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा स्टारर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४० कोटींचा गल्ला जमवला. तर या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी जवळपास ४५ कोटींची कमाई केली. दोन दिवसांत या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ८५ कोटींचा आकडा पार केला आहे. पाच दिवसांच्या वीकेंडमध्ये हा चित्रपट जवळपास १७५ कोटींच्या कमाईचा आकडा पार करेल असा अंदाज आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडेवर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांचे निधन

‘ओएमजी २’ चे दुसऱ्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास १० कोटींची कमाई केली. ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाचे दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन १५ कोटींच्या आसपास आहे. एकूणच या चित्रपटाने दोन दिवसांत २५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटालाही मोठ्या वीकेंडचा फायदा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ हे दोन्ही आधी आलेल्या चित्रपटांचे सिक्वेल आहे. ‘गदर एक प्रेम कथा’ हा चित्रपट २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. तर, ‘ओएमजी’ हा २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. सध्या या दोन्ही चित्रपटांच्या सिक्वेलची बॉक्स ऑफिसवर जादू सुरू आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadar 2 vs omg 2 box office collection day 2 sunny deol film earn 45 crore akshay kumar film earn 15 crore hrc