बॉलीवूड अभिनेते गजराव राव सध्या त्यांच्या ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहे. यामध्ये गजराज राव यांनी कार्तिकच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या संघर्षाच्या दिवसांबद्दल आणि भूमिका स्वीकारताना मानधन कमी का करत नाही याबाबत खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : दोन प्रसिद्ध मराठी अभिनेत्री एकत्र गेल्या पावसाळी ट्रेकला; नेटकरी म्हणाले, “तुम्ही मैत्रिणी कधी झालात?”

‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेते गजराज राव यांनी वरुण दुग्गीच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. ‘बधाई दो’ या चित्रपटामुळे ते रातोरात कसे स्टार झाले आणि गेली २५ वर्ष त्यांनी चित्रपटसृष्टीत कसा संघर्ष केला याबाबत सांगताना अभिनेते म्हणाले, “एका दिग्दर्शकाने मला माझे मानधन कमी करण्याचा सल्ला दिला होता. परंतु मी त्याला सांगितले की, आजवर मी कठोर परिश्रम केले आहेत त्यामुळे आता जीवनात चांगल्या सुविधा मिळाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. मी माझे मानधन कमी करणार नाही.”

हेही वाचा : ‘जवान’च्या ट्रेलरला अवघ्या २४ तासांत मिळाले ‘इतके’ व्ह्यूज; नेटकरी म्हणाले, “आता सोशल मीडिया प्रमोशनशिवाय…”

“फक्त २० दिवसांचे काम आहे असे सांगून तो दिग्दर्शन मानधन कमी करा असे सांगत होता. तेव्हा मी त्याला स्पष्ट सांगितले की, २० दिवसांच्या कामासाठी नव्हे तर, मी २० वर्ष जी मेहनत घेतली आहे त्याचे है पैसे आहेत. जेव्हा मी फक्त चहा पिऊन पोट भरायचो, उपाशी झोपलो, लोकांचे अपशब्द ऐकले, दक्षिण मुंबई ते अंधेरी चालत प्रवास केला. हे पैसे त्या दिवसांचे आहेत”, असे गजराज राव यांनी त्या दिग्दर्शकाला सांगितले होते.

हेही वाचा : “सना सेटवर आमच्याबरोबर कधीच जेवली नाही, कारण…”, ‘बाईपण भारी देवा’च्या अभिनेत्रींनी केदार शिंदेंच्या लेकीचे केले कौतुक

गजराज राव पुढे म्हणाले, “मला आयुष्यात दिशा दाखवणारे कोणीही भेटले नाही. एकेकाळी माझी आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. आता मी या गोष्टी खूप सोप्या करून तुम्हाला सांगतोय पण, त्यावेळी माझ्याकडे जेवणासाठीही पैसे नव्हते. सगळी स्वप्न बाजूला ठेवून मी केवळ कुटुंबाला कसे सांभाळता येईल हे पाहत होतो.”

हेही वाचा : लेकीच्या जन्मानंतर आलिया भट्टने कसं कमी केलं वजन? व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “बरोबर ६ आठवड्यांनी…”

गजराज राव पुढे म्हणाले, “आता मला जीवनात आर्थिक सुरक्षा जास्त महत्त्वाची वाटते. कारण, २५ ते ३० वर्ष मी खूप मेहनत घेतली आहे. मला चांगल्या ठिकाणी फिरायला, महागडे फोन, लक्झरी हॉटेल्समध्ये राहायला आवडते आणि या गोष्टी सांगायला मला आता लाज वाटत नाही.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gajraj rao talks about his struggle journey says slept hungry listened to abuse sva 00